Sagar Ekoskar
Sagar Ekoskar  Dainik Gomantak
गोवा

Sagar Ekoskar : वादग्रस्त पोलीस अधिकारी एकोस्कर यांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

गोमन्तक डिजिटल टीम

Sagar Ekoskar : वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि इतरांविरोधात प्राणघातक हल्लाप्रकरणी दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निकाली काढली आहे. हनुमंत परब आणि फ्लॉयड कुतिन्हो यांनी ही याचिका दाखल केली होती. खंडपीठाने जरी ही याचिका निकालात काढली असली तरीही याचिकाकर्त्यांना राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे जाण्याची मुभा दिली आहे.

वादग्रस्त पोलीस उप अधीक्षक सागर एकोस्कर आणि अन्य पोलिसांच्या विरोधात आपली छळवणूक चालविल्याचा आरोप केलेले मडगाव येथील व्यावसायिक फ्लॉयड कुतीन्हो यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेली रिट याचिका दाखल करून घेत न्यायालयाने गोवा राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकाना नोटीस जारी केली होती. आता ही याचिका निकालात काढण्यात आली आहे.

आपल्याकडून 10 लाखांची लाच मागण्यासाठी एकोस्कर हे मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक असताना आपल्या सहकारी पोलिसांच्या मदतीने आपल्यावर खोटी केस तयार करून आपला छळ चालविल्याचा आरोप कुतीन्हो यांनी करून हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे नेले होते.

तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांच्या विरोधात वाळपई पोलीस ठाण्यात विनाकारण मारहाण आणि हिंसाचार केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली होती.

दरम्यान शेळ - मेळावली येथील आयआयटी प्रकल्पविरोधात झालेल्या आंदोलनावेळी तत्कालिन पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी मानवी हक्काचे उल्लंघन केले नसल्याचे चौकशी अहवालात निरीक्षण करत त्यांना मानवी हक्क आयोगाने यापूर्वीच ‘क्लीन चीट’ दिली आहे. तक्रारदार वारंवार राजन घाटे सुनावणीवेळी अनुपस्थित राहिल्याने व निरीक्षक एकोस्कर यांच्याविरुद्धचे आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाले नसल्याचे निरीक्षण चौकशीत करण्यात आले आहे.

शेळ - मेळावली येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या सर्वेसाठी स्थानिक मेळावली लोकांनी आंदोलन उभे केले होते. आंदोलन मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. स्थानिक पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर या आंदोलनावर लक्ष ठेवून होते. पोलिसांनी या आंदोलकांना हुसकून लावण्यासाठी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या असता त्याला प्रत्युत्तर देण्यास दगडफेक झाली. यावेळी काही महिलांनी प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वाटेवरच झोकून दिले. त्यावेळी तेथे असलेल्या निरीक्षक एकोस्कर यांनी एका महिलेच्या छातीवर पाय ठेवून पलिकडे गेल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात राजन घाटे यांनी 12 जानेवारी 2021 रोजी मानवी हक्क आयोगाकड तक्रार दाखल केली होती. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, वाळपईचे निरीक्षक सागर एकोस्कर व वाळपई - सत्तरी उपजिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT