Goa CM Pramod Sawant News Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकारला दणका; पंचायत निवडणुका पुढे ढकलण्यास कोर्टाचा नकार

आदेशानुसार येत्या 12 ऑगस्टपर्यंत पंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार

आदित्य जोशी

पणजी : गोवा सरकारने पंचायत निवडणूक 30 दिवसांनी पुढे ढकलावी अशी विनंती करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केला होता. तो आज गुरुवारी खंडपीठाने फेटाळला आहे. त्यामुळे गोवा सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या 12 ऑगस्टपर्यंत पंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

(Goa Panchayat Election News Updates)

186 पंचायतीच्या निवडणुकांची अधिसूचना तीन दिवसात जारी काढून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण करावी असा आदेश गोवा खंडपीठाने मंगळवारी दिला होता. यावर पावसाळा व विधानसभा अधिवेशनाचे कारण देऊन सरकारने निवडणुकांसाठी आणखी एक महिन्याचा म्हणजे 12 सप्टेंबरपर्यंत वेळ द्यावा अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात सादर केली होती. यावर सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखीव ठेवण्यात आला होता.

186 पंचायतींच्या निवडणुका घ्यायचे असतील तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण लागू करताना त्रिसूत्री लागू करावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 10 मे ला दिल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला होता. याविरोधात सुकुर पंचायतीचे संदीप वजरकर न्यायालयात गेले होते तर याच याचिकेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनीही हस्तक्षेत याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने तीन दिवसात अधिसूचना काढण्याचा निकाल देवून सरकारला दणका दिला होता. आता उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यामुळे येत्या 12 ऑगस्टपर्यंत पंचायत निवडणुका घेण्याचं आव्हान गोवा सरकारपुढे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT