पणजी: पर्वरीतील आयएचएम (Institute of Hotel Management) इमारतीच्या लॉकर रूममध्ये आज (३ मार्च) बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बॉम्ब शोध पथक आणि अग्निशमन दलाने इमारतीची सखोल तपासणी केली, मात्र कोणताही स्फोटक पदार्थ आढळला नाही. पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांनी ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलीस अधिक तपास करत असून, ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी आणि शांतता राखावी, असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.
पालकांमध्ये भीतीचं वातावरण
याआधी धमकींच्या ई-मेलमुळे अनेक विमान कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. मात्र, आता शाळांना देखील धमकीचे ईमेल येताना दिसत आहेत.
शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानं पालकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. आता धमकीच्या प्रकरणी पुढील तपास केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.