bollywood actress Sanya Malhotra Nitanshi Goel  Dainik Gomantak
गोवा

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

IFFI Goa 2024: सान्या मल्होत्राच्या मिसेस चित्रपटाचा प्रीमियर पणजीतील आयनॉक्समध्ये पार पडला.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात २० नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवात देश विदेशातील चित्रपटांचे प्रदर्शन होतेय. बॉलीवूड - हॉलीवूडच्या काही मोजक्या चित्रपटांचे इफ्फीत वर्ल्ड आणि एशिया प्रीमियर होतायेत. अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या मिसेस चित्रपटाचा प्रीमियर पार पडला.

सान्या मल्होत्राच्या मिसेस चित्रपटाचा प्रीमियर पणजीतील आयनॉक्समध्ये पार पडला. या प्रीमियरला सान्या स्वत: हजर होती. प्रीमियरला जात असताना सान्याला मिडियाने रोखले पण, घाईत असलेल्या सान्या पुढे निघून गेली. दरम्यान, यावेळी तिने मिडियातील एका मित्राला तू चित्रपट पाहणार नाहीस का? असा प्रश्न विचारला. (bollywood actress Sanya Malhotra In iffi goa)

सान्या मल्होत्रा इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यापासून गोव्यात हजर आहे. उद्घाटन सोहळ्यात तिने सुरुवातीला रेड कार्पेटवर हजेरी लावली. त्यानंतर रात्री उद्घाटन सोहळ्यात विविध गाण्यावर सादरीकरण केले. गोव्यात इफ्फीतील क्षणचित्रांचा एक व्हिडिओ सान्याने पोस्ट केला आहे.

याशिवाय लापता लेडिजमुळे प्रसिद्धीच्या झोतात नितांशी गोएल देखील इफ्फीच्या रेड कार्पेटवर दिसून आली. नितांशी यावेळी चाहत्यांसोबत फोटो काढले व मिडियासाठी देखील काही पोझ दिल्यानंतर ती पुढील कार्यक्रमासाठी निघून गेली.

दरम्यान, गोव्यात २८ तारखेपर्यंत चालणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावत आहेत. जगभरातील सिनेरसिकांसाठी हा महोत्सव एक पर्वणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT