The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

The Sabarmati Report Tax Free In Goa: यापूर्वी भाजपशासित उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, छत्तिसगड, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्सी फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा
The Sabarmati Report
Published on
Updated on

The Sabarmati Report Tax Free In Goa

पणजी: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत घोषणा केलीय. ५५ व्या इफ्फी दरम्यान या चित्रपटाचे special screening आयोजित करण्यात आले, मुख्यमंत्री सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदिन्हो आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांनी हा चित्रपट पाहिला.

गुजरातमध्ये २००२ साली साबरमती एक्सप्रेसमध्ये गोध्रा येथे झालेल्या अग्निकांडावर 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट आधारलेला आहे. १५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीत या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी या स्क्रिनिंगला हजेरी लावली.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्सी फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा
IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

"द साबरमती रिपोर्ट हा चित्रपट फॅक्ट्सवर आधारित आहे. केव्हा ना केव्हा तरी सत्य समोर येत असते. २२ वर्षानंतर याबाबत सत्य समोर आले आहे. चित्रपटाच्या रुपाने लोकांसमोर ते मांडले जात आहे. द साबरमती रिपोर्ट चित्रपट निर्माण करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो", असे मुख्यंत्री सावंत म्हणाले.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्सी फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा
IFFI 2024: चित्रपट कार्यशाळेत डॉ. इंद्रनीलनी सांगितली भारतीय चित्रपट मागे राहण्याची कारणे; म्हणाले की 'डिजिटल माध्यमांमुळे सिनेसृष्टीचे भविष्य..'

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी द साबरमती रिपोर्ट गोव्यात टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली. यापूर्वी भाजपशासित उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, छत्तिसगड, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

द साबरमती रिपोर्ट चित्रपटात बॉलिवुड अभिनेता विक्रांत मॅसी, राशी खन्ना, रिधी डोगरा, बरखा सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

काँग्रेसची टीका

'भाजप सरकारकडे गोवा चित्रपट अनूदान योजना राबवायला पैसे नाहीत, २०११ पासून तयार झालेल्या चित्रपटांची गोवा चित्रपट निर्मात्यांना जुनी देणी दिलेली नाहित आणि गोवा राज्य चित्रपट महोत्सव आयोजित करणे सरकारला जमत नाही, परंतू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना एका बिगर-गोमंतकीय निर्मात्याचा प्रोपोगांडा चित्रपट करमुक्त करायचा आहे', अशी टीका काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com