Sameera Reddy  
गोवा

Places To Eat In Goa: गोव्यात कुठे, काय खायचं? प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने सुचवली सहा ठिकाणं

गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे नाहीत तर त्याच्यापलीकडे जाऊन बघण्यासारखा आहे

गोमन्तक डिजिटल टीम

अभिनेत्री समीरा रेड्डीने अलीकडेच गोवा टुर केली. या दरम्यान तिने खाद्यभ्रमंती करत खवय्यांना अनेक नवीन ठिकाणांची माहिती देणारी पोस्ट केली आहे. या खाद्यभ्रमंतीत तिने शोधलेली ठिकाणे जरा हटके आहेत. यामध्ये गोव्यातील खाद्यसंस्कृतीने नटलेली ठिकाणे ज्यात गोव्यातील फेणी, हुर्राक तसेच चटपटीत मिसळवडा यांचाही समावेश दिसून येतो.

गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे नाहीत तर गोवा त्याच्यापलीकडे जाऊन बघण्यासारखा आहे. राजधानी पणजीपासून २८ किमी अंतरावर वसलेले फोंडा हे गोव्याचे हृदय आणि इथली सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. फोंडा परिसरात पाहण्यासारखी अनेक मंदिरे आहेत तसेच राज्याच्या औद्योगिक घडामोडींचे केंद्रस्थान असा याचा नावलौकिक आहे.

चित्रपट अभिनेत्री समीरा रेड्डीने नमूद केले की गोव्यातील कलाकार मंजरी वरदे आणि खाद्य विश्लेषक तसेच तज्ञ सिया शिरवईकर जी 'दॅट चीझी गोअन' नावाने सोशल मीडिया अकाऊंट चालवते तिच्यासोबत फोंडयामधील काही ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखली. तिने सुचवलेली काही खास जागांबद्दल आपण माहिती घेऊ.

संदीप वडा पाव

वडापावसाठी गोवा हे कुणासाठीच पसंतीचे पहिले ठिकाण असू शकत नाही परंतु जर तुम्ही फोंडयामध्ये असाल तर तुम्हाला मुंबई पद्धतीचा बेस्ट वडापाव मिळेल. हा वडापाव व्यवसाय करणारा पूर्वी पान विक्रेता होता.

महाविद्यालयाजवळ त्याचे ठिकाण असल्याने तो वडा पाव कसा बनवायचा हे शिकला. आवश्यकतेनुसार तो चवीत सुधारणा आणि योग्य बदल करत राहिला अशी त्याच्याबद्दल माहिती दिली. बटर, शेव, काजू, चटणी, टोमॅटो सॉस, कोथिंबीर आणि कांद्याच्या मिश्रणाने बनणारा इथला वडापाव आता त्याच्या चवीमुळे ओळखला जातो.

पत्ता: नागेशी मंदिर रोड, दोशीवाडा, बांदोडा, गोवा.

वेळ: सकाळी १० ते १२.३०, संध्याकाळी ४.३० ते ७.३०

उमेशची गाडी

गोवा कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या विद्यार्थ्यांसाठी गॉडफादर म्हणून ओळखला जाणारा उमेश जवळपास २० वर्षे चविष्ट आणि खिशाला परवडणारे पदार्थ देत असल्यामुळे या भागातील तो एक खास व्यक्ती आहे.

त्याच्या हातची खास गोष्ट म्हणजे पावसाळ्यातील गरमागरम मॅगी नूडल्स. या नूडल्ससाठी त्याने स्वत:चा एक विशेष मसाला तयार केला आहे ज्यामुळे मॅगीला भन्नाट चव येते. यासोबतच गोवन स्पेशल रस ऑम्लेट आणि समोसे हे इथले पदार्थ लोकाना भयानक आवडतात.

पत्ता: गोवा कॉलेज ऑफ इंजिनियरींग, इन्फीनिटी ग्राऊंडजवळ, फार्मागुडी

वेळ : सकाळी ११ ते २.३०, संध्याकाळी ६.३० ते ११

लक्ष्मी बार

गोव्यात येऊन फेणीचा आस्वाद नाही घेतला असे होतच नाही. फेणी, हुर्राकचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला भरपूर स्थानिक बार मिळतील पण लक्ष्मी बारमध्ये तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने या पेयांची चव घेऊ शकता.

इथे फेणी लेमनग्रास, आले, जीरा, मसाला आणि इलायची या पाच प्रकारांमध्ये मिळते तर हुर्राक साध्या, लेमनग्रास, आले अशा ३ प्रकारांमध्ये मिळते. इथे जोडीला तुम्ही चिकन कटलेट किंवा केळीच्या पानांत वाफवलेले चिकन घेतलेत तर tuतुम्हाला आणखीन मजा येऊन जाईल.

पत्ता: तळमजला, सेंट्रल मेंशन, एसबीआय बिल्डिंगनजीक दुर्गभाट, फोंडा

वेळ: दुपारी १२.३० ते ३, संध्याकाळी ७.३० ते १०.३०

सदू (महेश बार)

वेगवेगळ्या पद्धतीच्या बारची सफर करताना चिकन मिरचीसाठी प्रसिद्ध झालेले हे ठिकाण अजिबात चुकवू नका. सदूची मिरची या नावाने इथे एक डिश प्रसिद्ध आहे. इथल्या स्पेशल रेसिपीने बनवलेले चिकन कत्री ब्रेड रोलसह दिले जाते. हा खास गोवन ब्रेड आहे जो विशिष्ट आकारात कापला जातो जो बाहेरून खरपूस आणि मध्यभागी मऊ राहील अशा पद्धतीने बेक केला जातो.

पत्ता: रामनाथी, फोंडा, बांदोडा

वेळ : दुपारी १ ते ३.३०, आणि संध्याकाळी ६.३० ते ११

नीता कॅफे

१९७१ पासून गोवन-शैलीतील महाराष्ट्रीयन पदार्थ देणारा हा छोटासा कॅफे लोकांना आवडतो. गोवन चवीच्या मिसळ पावसोबत ते त्यांच्या वाफाळत्या गरम भज्या आणि मसाला चहासाठी हे ठिकाण ओळखले जातात. पावसाळ्यात जिभेचे चोचले पुरवायचे असतील तर हे उत्तम ठिकाण आहे.

पत्ता: आगापूर, बांदिवडे

वेळ : सकाळी ७.३० ते १, संध्याकाळी ५ ते ८.३०

खोप इन

हे ठिकाण तुम्ही तुमच्या यादीत घेतलेच पाहिजे. जुलैमध्ये फक्त चार रविवारी उघडे असणारे हे खास ठिकाण इथल्या डॅम चिकन कॅफेरियलमुळे प्रसिद्ध झाले आहे .

पूर्वकल्पना दिल्याशिवाय इथल्या मेन्यूचा तुम्हाला आस्वाद घेता येणार नाही, त्यामुळे इथे जाण्यापूर्वी फोन करायला अजिबात विसरू नका. इथे गेल्यावर कॅफ्रेल मसाल्याच्या स्वादाने लपेटलेले चिकन आणि कत्री रोलचा डोळे झाकून आनंद घ्या. ग्रामीण गोव्याची मोकळी हवा आणि आजूबाजूला असणाऱ्या हिरव्यागार शेतांच्या सान्निध्यात गरमागरम जेवणाची मजा घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT