Bollywood Actress Pooja Mishra Viral Video Dainik Gomantak
गोवा

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Bollywood Actress Pooja Mishra Viral Video: पणजी: रिक्षात धूम्रपान करताना हटकल्याने बॉलिवूड अभिनेत्री पूजा मिश्राला राग अनावर झाला.

Manish Jadhav

पणजी: नेहमीच वादात असणारी बॉलिवूड अभिनेत्री पूजा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. रिक्षात धूम्रपान करताना हटकल्याने पूजाला राग अनावर झाला. यावरुन तिने एकाला थेट शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कला अकादमी, पणजी येथे हा प्रकार उघडकीस आला. गोव्यात सध्या सुरु असलेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी पूजाने हजेरी लावली होती.

नेमकं झालं काय?

कला अकादमी, पणजी येथे एका रिक्षामध्ये पूजा धूम्रपान करत होती. याचदरम्यान, तिला एकाने हटकले. ही जागा धूम्रपान करण्याची नाही. तुम्ही इथे धूम्रपान करु नका असे त्याने म्हटल्यावर पूजाला राग अनावर झाला. तिने थेट त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तिने त्याला शिवीगाळही केली. जेव्हा त्याने व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने तिथून पळ काढला. पणजीतील (Panaji) या भागात मोठी वर्दळ असते.

दरम्यान, अभिनेत्री पूजा मिश्रासाठी वाद काही नवा नाहीये. अलीकडेच, पूजाचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत भांडताना दिसत होती. दिल्लीतील (Delhi) हॉटेल ताज द्वारका येथे ही घटना घडली होती. पूजा ज्या हॉटेलमध्ये उतरली होती त्या हॉटेलच्या रुममध्ये काहीतरी तिने तोडले होते. जेव्हा त्याची भरपाई मागितली तेव्हा तिने भरपाई देण्यास नकार दिला. हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिला हॉटेल कर्मचाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT