Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: महाराष्ट्रातून बॉयलर कोंबड्या घेऊन गोव्याला येणाऱ्या जीपचा नानोड्यात अपघात, चालकाची सुखरुप सुटका

Nanoda Jeep Accident: बॉयलर कोंबड्यावाहू जीपगाडीला झालेल्या अपघातात जीपगाडीच्या केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाची डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. तर जीपगाडीतील अन्य एकाने स्वतःच सुटका करुन घेतली.

Manish Jadhav

डिचोली: बॉयलर कोंबड्यावाहू जीपगाडीला झालेल्या अपघातात जीपगाडीच्या केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाची डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. तर जीपगाडीतील अन्य एकाने स्वतःच सुटका करुन घेतली. हा अपघात बुधवारी (18 जून) पहाटे अस्नोडा-दोडामार्ग रस्त्यावरील नानोडा येथे घडला.

दरम्यान, या अपघातात (Accident) जीपगाडीच्या केबिनमध्ये अडकलेल्या मूळ पाटणे-महाराष्ट्र येथील सिद्धांत नाईक या चालकावर डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

एमएच-09-ईएन-5485 या क्रमांकाची जीप महाराष्ट्रातून (Maharashtra) बॉयलर कोंबड्या घेऊन गोव्यात येत होती. नानोडा येथे आधीच कोसळलेल्या झाडाचा जीपचालकाला अंदाज आला नाही आणि जीपगाडीने सरळ झाडाला धडक दिली. या अपघातात जीप चालक केबिनमध्ये अडकून पडला. डिचोली अग्निशमन दलाला या अपघाताची माहिती मिळताच, उपअधिकारी शिवाजी नाईक आणि अर्जुन धावस्कर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी अपघातस्थळी धाव घेतली. जवानांनी जीपगाडीच्या केबिनचा पत्रा कापून चालकाला सुखरुप बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

Operation Sindoor: पाक लष्कराचे पितळ उघडे! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानचाच पराभव; इम्रान खान यांच्या बहिणीच्या दाव्यानं खळबळ

Pakistan Heavy Rain: पाकिस्तानात पावसाचा हाहाकार! खैबर पख्तूनख्वामध्ये पूर अन् भिंती कोसळून 12 जणांचा मृत्यू; 5 बालकांचा समावेश

India vs Zimbabwe T20: श्रेयस अय्यरची 'अग्निपरीक्षा'! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा; पाहा संपूर्ण संघ अन् वेळ

Goa U19 cricket: आदित्य कोटा, मिहीर कुडाळकरची अर्धशतके निष्फळ; पुदुचेरीचा गोव्यावर 110 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT