Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: कोमुनिदादच्या जमिनीवरील 19 आलिशान बांधकामांवर फिरणार बुलडोझर, आदेश जारी; 'त्या' राजकीय नेत्याचे प्रयत्न ठरले विफल

Bogmalo illegal construction: चिकोळणा बोगमाळो कोमुनिदादच्या मालकीच्या सर्वे क्र. ४/१ मधील बेकायदा बंगले आणि घरे त्वरित खाली करावीत, अन्यथा ती पाहण्याचे आदेश दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासकांनी जारी केले आहेत.

Sameer Amunekar

वास्को: चिकोळणा बोगमाळो कोमुनिदादच्या मालकीच्या सर्वे क्र. ४/१ मधील बेकायदा बंगले आणि घरे त्वरित खाली करावीत, अन्यथा ती पाहण्याचे आदेश दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासकांनी जारी केले आहेत. या आदेशामुळे फ्रेंड्स कॉलनीतील आलिशान बांधकामांवर बुलडोझर फिरणे अटळ बनले आहे.

फोरम अगेन्स्ट करप्शन, इललिगेलिटी ॲण्ड डिस्ट्रक्शन्स या संस्थेचे संजय म्हाळशेकर आणि रुई आरावेझो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने बांधकामे बेकायदा असल्याचे स्पष्ट केले. खंडपीठाने ही बांधकामे आठ दिवसांत पाडण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व कोमुनिदाद प्रशासकांना दिले.

कोमुनिदाद प्रशासकांनी या कारवाईसाठी खंडपीठाकडे अतिरिक्त १२ आठवड्यांची मुदत मागितली होती. ती मंजूर झाल्यानंतर काही काळ कारवाईला स्थगिती मिळाली. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर अखेर २१ जुलै रोजी प्रशासक प्रजित चोडणकर यांनी संबंधित १९ बांधकामे त्वरित खाली करावी, अन्यथा ती पाडण्यात येतील, असे आदेश दिले आहेत.

राज्य सरकार, पंचायत संचालनालय, चिकोळणा-बोगमाळो पंचायत, चिकोळणा कोमुनिदाद, दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरण (एमपीडीए) यांना प्रतिवादी होते. याचिकाकर्त्यांनी चिकोळणा-बोगमाळो येथील कोमुनिदादच्या सर्व्हे क्र. ४/१ मधील जमिनीत मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

मुरगाव तालुक्यातील एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे कोमुनिदादच्या जागेवर ही आलिशान बांधकामे उभी राहिली होती. संबंधित भूखंड त्यांच्या निकटवर्तीयांना देण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT