The body was found on the side of the railway track in bally Dainik Gomantak
गोवा

बाळ्‍ळीत रेल्‍वे ट्रॅकच्‍या बाजूला सापडला मृतदेह

मृताच्या डोक्याला आणि हाताला जखमा

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कोकण रेल्वे पोलिसांना बाळ्ळी येथे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. मयत पुरुष इसमाचे वय अंदाचे 40 ते 45 च्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्‍याच्या अंगावर हाफ टी-शर्ट आणि फूल पँट आहे. तसेच या व्यक्तीच्या डोक्याला आणि हाताला जखमा झाल्याच्या खुणा दिसत आहेत. पुढील तपासासाठी मृतदेह दक्षिण गोवा (goa) जिल्हाधिकारी हॉस्पिटलच्‍या शवागृहात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, तामणे-लोलये येथे घडलेल्‍या मायलेकीच्‍या संशयास्‍पद मृत्‍यूप्रकरणाने काणकोण नव्‍हे तर संपूर्ण राज्‍याला हादरवून सोडले आहे. मुलगी अंकिता प्रकाश पोळजी हिच्या मृतदेहाची चिकित्सा आज बुधवारी मडगावच्‍या हॉस्पिसियो हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. हा अहवाल दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीत अंकिताच्‍या मृतदेहावर काही जखमा व ओरबडल्‍याच्‍या खुणा सापडल्‍या आहेत. त्यामुळे तिच्या मृत्यू (Death) प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई यांच्यामार्फत या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तिचा व्हिसेरा जतन करून पुढील तपासासाठी तो हैदराबाद येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काणकोण पोलिस (police) स्थानकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक रिफा बार्रेटो यांनी सांगितले. अंकिताचे लग्न होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT