Death body Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या कळंगुट किनाऱ्यावर तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने खळबळ

आज पहाटे कळंगुटच्या समुद्र किनारी त्याच मुलीचा नग्नावस्थेतील मृतदेह स्थानिक लोकांना दिसल्याने तात्काळ कळंगुट पोलिसांना कळविण्यात आले.

दैनिक गोमन्तक

शिवोली: बाणावली येथील बलात्कार प्रकरण ताजे असतांनाच बार्देशातील नाश्नोळा-हळदोणा येथील तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह आज गुरुवारी सकाळी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर (Calangute )आढळला. या घटनेने गोव्यात (Goa) सर्वत्र खळबळ माजली आहे. कळंगुट पोलिसांनी म्रुतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. दरम्यान, मृत मुलीचा अज्ञाताकडून बलात्कार करून खुन झाल्याचा संशय स्थानिक पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. Body of young woman was found without cloth on shores of Calangute in Goa

दरम्यान, वायंगवाडा-नाश्नोळा येथे राहाणाऱ्या नाईक कुटुंबात  एकुण चौघां भावंडांपैकी ती घरात सर्वात मोठी होती. मयडेतील सेंट झेवियर हायस्कूल मधून तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले होते.  सध्या त  पर्वरीतील एका नामांकित खाजगी मॉलमध्ये कामाला होती. बुधवारी सकाळी पर्वरीत  कामावर गेलेल्या मुलीचा रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे घरच्यांनी म्हापसा पोलिसांत तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली होती.

आणि आज गुरुवारी पहाटे कळंगुटच्या समुद्र किनारी त्याच मुलीचा नग्नावस्थेतील मृतदेह स्थानिक लोकांना दिसल्याने तात्काळ कळंगुट पोलिसांना कळविण्यात आले. कळंगुटच्या उप-निरीक्षक प्रगती नाईक यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी साठी बांबोळीच्या गोमेकॉत पाठवून दिला आहे. पुढील तपास निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT