फोंडा: बेतोडा येथील एका खासगी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची तक्रार फोंडा पोलिसांत दाखल केली असून याप्रकरणी शिक्षक तसेच शाळेचा अध्यक्ष अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाचा हा प्रकार 2019 मध्ये झाला असून या प्रकाराचे कुणीतरी मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केल्याने त्याला वाचा फुटली. मात्र, विद्यार्थिनींचे पासपोर्टसाईझ फोटो हवे असल्याने त्यांचे कपडे बदलण्यात आल्याची सारवासारव संशयितांनी केल्याने पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Two underage students were raped again In Goa)
विशेष म्हणजे संशयित जावई आणि सासरा अशा नात्यातील आहेत. या विद्यार्थिनींचे कपडे जावयाने सासऱ्याच्या उपस्थितीत बदलले, असा हा प्रकार आहे. हा प्रकार 2019 मध्ये जेव्हा शाळा सुरू होत्या, त्यावेळचा असून गेले दीड वर्ष शाळा बंदच असल्याने हा व्हिडिओ तक्रारीसाठी संबंधितांकडे पाठवला नसल्याचे व्हिडिओ तयार करणाऱ्याने सांगितले.
बेतोडा येथील या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात या अल्पवयीन विद्यार्थिनींचे कपडे बदलतानाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ ‘गोंयच्या बायलांचो एकवट’ या संघटनेच्या साजिदा जकाती यांना पाठवल्यानंतर साजिदा यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. सांस्कृतिक कार्यक्रम असूनही पासपोर्टसाईझ फोटो काढण्यासाठी कपडे बदलले, असे संशयितांचे म्हणणे आहे.
साजिदा यांच्या तक्रारीनुसार पोलिस तपास करीत असून संशयितांना अद्याप अटक केलेली नाही. फोंडा पोलिसांनी विनयभंगप्रकरणी दंडसंहिता कलम 354 बी तसेच गोवा चिल्ड्रन्स ॲक्ट पोक्सो कायदा 8 व 12 अंतर्गत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फोंडा पोलिस निरीक्षक मोहन गावडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अपहरणानंतर मुलीवर अतिप्रसंग
पर्ये-सत्तरी येथील एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून नंतर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी कुबलवाडी-मणेरी (ता. दोडामार्ग, सिंधुदुर्ग) येथील रामा उर्फ अक्षय वसंत नाईक (वय 31 वर्षे) या संशयिताला अटक केली. संबंधित मुलीच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर वाळपई पोलिसांनी ही कारवाई केली. मुलीच्या वडिलांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार संशयिताने 9 ऑगस्ट रोजी पर्येे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला आपल्या घरी नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वाळपई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.