Goa Crime news Dainik Gomantak
गोवा

संशयास्पद मृत्यू : ‘कंचना-3’मध्ये आलेक्झेंड्राने साकारली होती भूमिका

पोलिस नातेवाईकांच्या प्रतिक्षेत, युवतींचा मृतदेह अद्यापही शवागरात, प्रसार माध्यमावर गोवा पुन्हा चर्चेत

दैनिक गोमन्तक

शिवोली : गुरुवारी संध्याकाळी ओशेल पंचायत क्षेत्रात वेगवेगळ्या जागेत खाजगी गेस्टहाऊसवर मृतावस्थेत सापडलेल्या आलेक्झेंड्रा रि डिजावी (२४) तसेच एकातिरोना टिटोव (३४) या दोघीचे मृतदेह अद्याप बांबोळीच्या शवागारात शवचिकित्सेच्या प्रतिक्षेत पडून आहेत. त्यांचे जवळचे नातेवाईक गोव्यात आल्यानंतर शवचिकित्सा होणार आहे, अशी माहिती हणजुण पोलिस स्थांनकाचे निरीक्षक सूरज गांवस यांनी दिली. तपास कामात मद्रास पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचे खास सूत्रांनी सांगितले.

एक आलेक्झेंड्रा ही एक उत्तम अभिनेत्री होती. तिने भारतात तमिळ चित्रपटातही काम केले होते. आलेक्झेंड्रा ही भारतात गेल्या काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करीत होती. तिने मॉडेलींगमध्ये बरेच नाव कमावले होते. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. २० ऑगस्ट रोजी शिवोली येथील दोन्ही रशियन महिलांचे मृतदेह आढळले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला होता.

आलेक्झेंडा रि डिजावी (वय २४) ही चांगली मॉडेल होती. मात्र, ती अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती व मित्रांसेाबत ती राहायची. तिच्या वागणुकीतही बदल झाला होता, असे तिच्या मित्रांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले. तिने भारतात काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘कांचना - ३’ या तमिळ चित्रपटात तिला संधी मिळाली होती. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट राघवा लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता. हास्य आणि भीतीपट स्वरूपाचा हा चित्रपट तमिळ सिनेरसिकांनी बराच डोक्यावरही घेतला होता. या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. तिने साकारलेले ‘रोझी’ अनेकांना भावली होती. निकी तांबोळी, तरुण अरोरा यांनीसुद्धा या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

छायाचित्रकाराकडून ब्लॅकमेल

चेन्नईतील एका छायाचित्रकाराने आपला शारीरिक छळ केल्याबद्दल आलेक्झेंड्राने पोलिसात तक्रार दाखल केली होती. हा छायाचित्रकार आलेक्झेंड्राची काही अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याच्या धमक्या देत होता. जर माझी मागणी पूर्ण केली नाही, तर मी फोटो व्हायरल करणार, अशी धमकी तो तिला देत होता. अखेर कंटाळून तिने चेन्नई पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर या छायाचित्रकाराला अटकही झाली होती.

‘मी टू मूव्हमेंट’मध्येही

आलेक्झेंड्राच्या या तक्रारीनंतर समाज माध्यमावर ‘मी टू मूव्हमेंट’ राबविण्यात आली होती. अशाच प्रकारची तक्रार अभिनेत्री अमाला पॉल हिनेही नोंदवली होती. प्रकरण वाढल्यानंतर चेन्नई पोलिसांनी संशयिताला अटक केली होती.

प्रसार माध्यमावर गोवा पुन्हा चर्चेत

आलेक्झेंड्राच्या मृत्यूबाबत समाज माध्यमांवर चर्चा रंगत आहे. आलेक्झेंड्रा ही रशियाची असल्यामुळे रशियन भाषेतही फेसबुक आणि टिव्टरवर प्रतिक्रिया उमटत आहेत. गोव्याच्या सुरक्षेबाबत अनेकजण प्रश्न विचारत आहेत. तिला प्राण का गमवावे लागले याचा शोध पोलिसांनी घ्यावा. आलेक्झेंड्राने तमिळ संस्कृतीचा अभ्यास करून यश मिळविणे. एका कलाकाराचा गोव्यात मृत्यू होणे धक्कादायक आहे, अशी समाज माध्यमांवर व्यक्त करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT