youth drowns in Dudhsagar river Danik Gomantak
गोवा

दूधसागर नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

ओकांब येथे नदीत उतरल्यानंतर सिद्धू मिश्रा गटांगळ्या खाऊ लागला आणि पाण्यात दिसेनासा झाला. त्याला वाचवण्याचे प्रयत्नही अपयशी ठरले.

दैनिक गोमन्तक

गोवा: ओकांब-धारबांदोडा येथील दूधसागर नदीत एकजण बुडाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मूळ उत्तर प्रदेश राज्यातील पण सध्या तिस्क - उसगाव येथे राहणारा सिद्धू मितेश मिश्रा (24) हा युवक दूधसागर नदीत बुडाला या बेपत्ता युवकाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. मात्र प्रतिक्षेनंतर सिद्धू मिश्रा या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.

(youth drowns in Dudhsagar river)

सिद्धू मिश्रा आणि अन्य पाचजण रविवार सुटीचा दिवस असल्याने मौजमजा करण्यासाठी संजीवनी साखर कारखान्यामागे दूधसागर नदीजवळ आले होते. ओकांब येथे नदीत उतरल्यानंतर सिद्धू मिश्रा गटांगळ्या खाऊ लागला आणि पाण्यात दिसेनासा झाला. त्याला वाचवण्याचे प्रयत्नही फोल ठरले.

सिद्धू हा उत्तर प्रदेशमधील रहिवासी

त्याच्या सहकाऱ्यांनी व इतरांनी या प्रकाराची माहिती पोलिस व फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या सिद्धूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण तो रात्री उशिरापर्यंत सापडू शकला नाही. सिद्धू हा उत्तर प्रदेशमधील गढवा-देवारिया येथील रहिवासी असून तो घोटमोड-तिस्क, उसगाव येथील नेस्ले कंपनीत कामाला होता. सध्या त्याचे वास्तव्य तिस्क-उसगाव येथेच होते. सिद्धू पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या गावी कुटुंबीयांना दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.पोलिसांसह अग्निशामक दलाला दिली.

बातोडा येथील युवकाचा काहीदिवसांपूर्वी बुडून मृत्यू झाला होता.

दरम्यान, दाभाळ येथे दूधसागर नदी ठिकाणी फिरायला गेलेल्या बातोडा येथील युवकाचा काहीदिवसांपूर्वी बुडून मृत्यू झाला होता. तर त्याच्या साथीदाराला वाचवण्यात यश आले होते. मात्र त्याला गंभीर स्थितीत पाण्यातून बाहेर काढून गोमेकॉत दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस दूधसागर (Dudhsagar) य़ेथील घटनास्थळी दाखल झाले होते, नदीत बुडालेल्या तरूणाचा पोलिसांनी (police) शोध घेऊन त्याचा मृतदेह रूग्णालयात हलवण्यात आला होता.

(Goa Latest News)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT