Body of a BSNL employee in Goa was found floating in river Dainik Gomantak
गोवा

खोर्लीतील 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला

भारतीय दूरसंचार निगमचे लिमिटेडचे (BSNL) कर्मचारी देवदत्त दामोदर गावस यांचा मृतदेह तार नदीच्या पात्रात तरंगताना दिसला.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: खोर्ली-म्हापसा येथील रहिवासी तथा भारतीय दूरसंचार निगमचे लिमिटेडचे (BSNL) कर्मचारी देवदत्त दामोदर गावस (43) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी तार नदीच्या पात्रात तरंगताना म्हापसा पोलिसांना सापडला. त्‍यांनी मानसिक तणावातून तार नदीत उडी टाकून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Body of a BSNL employee in Goa was found floating in river)

बुधवारी सकाळी तार पुलावरून एका अज्ञात तरुणाने नदीत उडी घेतल्याचे तेथील रहिवाशांनी पोलिसांना कळवले होते. त्यानंतर काल दिवसभर म्हापसा पोलिसांनी अग्निशमन दल व जीवरक्षकांच्या साहाय्याने नदीमध्ये मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्‍न केला होता. अखेरीस आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला.

मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तो देवदत्त गावस याचा असल्याची ओळख पटली. देवदत्त बेपत्ता असल्याने त्यांच्या पत्नीने बुधवारी रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली होती. देवदत्त यांच्‍या पश्चात पत्नी, दोन लहान मुले व आई असा परिवार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT