Goa Shravan Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Shravan Culture : गोव्यातला श्रावण.. निसर्ग समृद्धतेने आणि परंपरेने नटलेला!

पश्चिम किनारपट्टीच्या कुशीत वसलेल्या आपल्या गोव्याला निसर्गाचे अद्भुत वरदान लाभले आहे.

Kavya Powar

चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. या महिन्यात निसर्ग नव्याने फुलून आलेला असतो. नुकताच पाऊस सुरू झाल्याने निसर्गात अनेक नवे बदल झालेले असतात. या पर्यावरणीय बाजूसोबतच आध्यात्मिक बाजूनेही श्रावण इतर महिन्यांपेक्षा उजवा आहे. व्रत-वैकल्ये, पूजापाठ, देव-देवतांची उपासना करण्यासाठी श्रावणाचे खूप महत्व आहे.

(Goa Shravan Culture)

गोव्यातील श्रावणात होणारे पत्रीपूजन

पश्चिम किनारपट्टीच्या कुशीत वसलेल्या आपल्या गोव्याला निसर्गाचे अद्भुत वरदान लाभले आहे. इथल्या जंगलांमध्ये अनेक विविध प्रकारच्या नैसर्गिक, औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि झाडे आढळून येतात. हे औषधी गुणधर्म माणसाला उपयोगी यावेत म्हणून त्यांचा समावेश आपल्या पारंपरिक देवकार्यांमध्ये करण्यात आला. गोव्याच्या भूमीला वृक्षवनस्पतींचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा लाभलेला आहे. त्यामुळे मौसमानुसार निसर्गात मिळणाऱ्या या वनस्पती आणि पान-फुलांचे आपल्या सणांमध्ये, धार्मिक-सांस्कृतिक कार्यांमध्ये विशेष स्थान आहे.

श्रावणात पत्री-पूजनाला विशेष महत्व आहे. दर रविवारी विवाहित महिला आयतर पूजन करतात. यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या तृणपत्री, पाने आणि रानफुलांचा समावेश होतो. गोव्यात आयतार, मंगळागौर, हरतालिका पूजनात पत्रीचा वापर करण्याची परंपरा आहे.

सर्वसाधारणपणे कदंब, ब्राह्मी, अशोक, कण्हेर, धात्री, आघाडा, धत्तुर, मधुमालती, माका, बेल, श्‍वेतदुर्गा, बोर, शमी, रूई, डोरली, डाळिंब, ताड, अश्‍वत्थ, विष्णुकांता, मरू, देवदार, जाई, केवडा, अगस्ती, मुनीपत्र, चाफा, जपा, मल्लिका, नागचाफा, पुन्नाग, शाका, शत, पद्म, प्राजक्त, निर्गुंडी, शेवंती, कर्दली, मावळिंग, मंदार, गोकर्ण, नागवेल, सिंदुवार अशा वनस्पतींपैकी सोळा किंवा एकवीस वनस्पतींच्या पत्रींचा वापर पूजनात केला जातो.

श्रावणातील शाकाहाराचे महत्व

गोव्यात आहारामध्ये इतर गोष्टींबरोबरच माश्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. मात्र या कालावधीत आपली पचनशक्ती मंदावलेली असते. अशावेळी मांसाहार पचण्यास कठीण असतो. दुसरीकडे, या दरम्यान माश्यांची प्रजननाची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे मासेमारी बंद किंवा कमी प्रमाणात केली जाते.

शिवाय पावसामुळे वातावरणातील आर्द्रता आणि बुरशीचे प्रमाणही वाढते त्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. यामुळे या महिन्यात मांसाहार वर्ज्य असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT