Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

Goa Panchayat Election : कळंगुटमधील प्रभाग 9 मध्ये 12 वाजेपर्यंत 28 टक्के मतदान

कळंगुट पंचायतीच्या वार्ड 9 मधून 6 उमेदवार रिंगणात असून 950 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Published on

काल (10 ऑगस्ट) रोजी 186 पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र यादरम्यान कळंगुटमधील वार्ड क्रमांक 9 चे मतदान आजवर ढकलण्यात आले. उमेदवारांची नावं आणि चिन्ह यात विसंगती आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मतदानासाठी केंद्रावर आलेल्या मतदारांचा मात्र यामुळे चांगलाच खोळंबा झाला. तांत्रिक घोळामुळे मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागले.

Goa Panchayat Election
Goa School Merger : आमोणेत शाळा विलिनीकरणास तीव्र विरोध

दुपारी 12 वाजेपर्यंत या प्रभागात 28 टक्के मतदान पार पडले आहे. एकंदरीत चित्र पाहता मतदानाला मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले आहे. काल अचानक झालेल्या गफलतीमुळे मतदारांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता.

मतदानासाठी सरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदारांना मतदानासाठी आज पुन्हा सुट्टी घेणे भाग असल्याने वॉर्ड 9 मध्ये लोकांनी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

कळंगुट पंचायतीच्या वार्ड 9 मधून 6 उमेदवार रिंगणात असून 950 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसरीकडे, पेडणे तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. सकाळपासून मतदानकेंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. पावसाची पर्वा न करता मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पेडणे तालुक्यातील मोरजी, आगरवाडा, मांद्रे, पार्से, पालये, केरी, कोरगाव, हरमल, वझरी, तोरसे, तांबोसे, विर्नोडा, तुये, वारखंड, हणखणे, धारगळ, न्हयबाग-पोरसकडे या 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उत्साह दिसून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com