Ration Shop Dainik Gomantak
गोवा

रेशन दुकानात काळाबाजार? गोवा फर्स्टकडून पर्दाफाश

दुकानदार महिन्याच्या 21 तारखेला दुकान बंद करून पुढचे दहा दिवस आपल्या दुकानातील धान्याचा काळाबाजार करण्यास व्यस्त असल्याचा आरोप सोनुर्लेकर यांनी केलाय

दैनिक गोमन्तक

दाबोळी Dabolim : मुरगाव (Mormugao) येथील देस्तेरो ब्यूझी बी स्कूलजवळील नागरी पुरवठा विभागाच्‍या अंकुश रेडकर यांच्या स्वस्त धान्य दुकानातून सकाळी 11 च्‍या सुमारास एक दुचाकी चालक आपल्या दुचाकीवर पन्नास किलो वजनाची तांदळाची दोन पोती वाहून नेत असल्‍याचे उघड झाले आहे. पोती वाहून नेण्‍यासाठी रेडकर हे त्याला मदत करताना दिसत असल्‍याचा व्‍हिडिओ व्‍हायरल झाला आहे. गोवा फर्स्टचे परशुराम सोनुर्लेकर यांनी व्हिडीओचे चित्रण केल्‍याचा दावा केला आहे.

दुचाकी चालकाने दुचाकी चालू करून पुढे गेला असता त्याच्‍याकडे चौकशी केली असता, त्याने हे धान्य रेशनकार्ड शिवाय त्‍या स्वस्त धान्य दुकानातून खरेदी केल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोनुर्लेकर यांनी सोशल मीडियावर (Social media) व्हायरल करून स्वस्त धान्य दुकानदार मुरगाव तालुक्यातील घाऊक विक्रेत्यांना अन्नधान्‍याची बेकायदेशीर विक्री करत असल्याचा पोलखोल केला. तसेच याविषयी त्याने लेखी तक्रार नागरीपुरवठा खात्याच्या कार्यालयात केली आहे. तसेच स्वस्त धान्य दुकान मालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच मुरगाव तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानातून महिन्याच्या 21 तारखेला किती साठा विक्रीस गेला व किती बाकी आहे याचा अहवाल घेण्यात यावा, असे सूचविले. कारण, दुकानदार महिन्याच्या 21 तारखेला दुकान बंद करून पुढचे दहा दिवस आपल्या दुकानातील धान्याचा काळाबाजार करण्यास व्यस्त असल्याचा आरोप सोनुर्लेकर यांनी केला.

सरकारकडून हा धान्य कोटा गरीब जनतेसाठी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, सदर स्वस्त धान्य दुकानदार या धान्याचा काळाबाजार करून घाऊक विक्रेत्याना त्या धान्याची विक्री करुन जास्त पैसे वसूल करून घेतात. हा गरीब जनतेवर अन्याय असून सरकारने यावर त्वरित लक्ष घालावे, तसेच नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे (Govind Gawde) यांनीही यावर त्वरित लक्ष घालून असल्या बेजबाबदार काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकान मालकावर कारवाई करावी, असे सोनुर्लेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

SCROLL FOR NEXT