खांडोळा: नागरी पुरवठा मंत्री गोविद गावडे (Minister Govind Gawde) 21 रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी प्रसारमाध्यमावर प्रसारित झालेली बातमी खोटी असून केवळ अफवा असल्याचे मंत्री गोविंद गावडे यांन गोमन्तकशी बोलताना स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, अशा अनेक वेळा खोट्या बातम्या, अफवा पसरविण्यात आल्या. पण मी स्थिर असून प्रियोळाती स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा विश्वास, सहकार्य, पाठिंब्यानुसार माझी वाटचाल सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या विश्वासावरच सर्व काही अवलंबून असून प्रियोळचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास आहे. त्यामुळे कार्यकरत्यांचा विश्वासघात होणार नाही. कोणीही अशा अफवावर विश्वास ठेवू नये. कार्यकर्त्यांशी (workers) चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. प्रियोळातील कोणतेही विकासकामे, प्रकल्प, उपक्रम कार्यकर्ते, ग्रामस्थांच्या सहकार्याने, चर्चेनेच राबविले जातात. कोणत्याही कामाचे यश हे प्रत्येक प्रियोळकाराचे, मतदारांचे यश आहे. त्यामुळे कार्यकर्ता, मतदार हा महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच मी कार्यरत आहे, तेव्हा पक्षप्रवेश वगैरे सर्व काही खोटे आहे.
विरोधक बिथरले
विरोधक बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे अशा प्रकारे अफवा फसरविण्याचे प्रकार सुरू आहे. विकास कामांत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जनतेच्या सहकार्यांमुळे विकासाला गती आलेली असून लवकरात लवकर विविध विकास कामे पूर्ण करणार आहे.
प्रियोळात चर्चा
मंत्री गावडे 21 डिसेंबर रोजी भाजपात (BJP) प्रवेश करणार, प्रियोळात भव्य कार्यक्रम होणार, अशी वार्ता कळताच अनेकांचे भ्रमणध्वनी वाजू लागले. इतर इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतांचा हिशेब सुरू केला. समिकरणे कशी बदलणार यांची चर्चा सुरू केली. तथाकथित तज्ज्ञही कामाला लागले. मंत्र्यांनाही अनेकांनी फोन केला. पण अवघ्या काही क्षणात अफवा असल्याचे कळले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.