Goa BJP ZP candidates Dainik Gomantak
गोवा

BJP ZP List: गोवा जि. पं. रणसंग्राम! सत्ताधारी भाजपने फोडला नारळ; उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Goa Zilla Panchayat elections: भाजपने उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी पहिली यादी जाहीर केली आहे

Akshata Chhatre

BJP ZP candidate list 2025: गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी (भाजप) आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचे उमेदवार कधी जाहीर करणार, याकडे केवळ भाजप कार्यकर्त्यांचेच नव्हे, तर सर्व विरोधी पक्षांचेही लक्ष लागून होते. विशेषतः काँग्रेस पक्षाने तर थेट अशी भूमिका घेतली होती की, भाजपने यादी जाहीर केल्यानंतरच आम्ही आमच्या उमेदवारांची नावे घोषित करू. ही राजकीय कोंडी भाजपच्या घोषणेमुळे संपुष्टात आली आहे. भाजपने उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी पहिली यादी जाहीर केली आहे.

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर

भाजपने आज, रविवारी (दि.३०) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या प्रदेश निवडणूक समितीने या नावांना अंतिम मंजुरी दिली असून, या यादीमध्ये उत्तर आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या मतदारसंघांचा समावेश आहे. एकूण १९ उमेदवारांची नावे पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आली आहेत.

उत्तर गोव्यातील प्रमुख लढती

उत्तर गोवा जिल्हा परिषदेसाठी भाजपने पहिल्या यादीत १३ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

  • महिला आरक्षण: कळंगुटमधून फ्रँझिलिया सेलीन रॉड्रिग्स, कोलवाळमधून सपना वासुदेव मापरी, तर रेईश-मागोसमधून रेश्मा संदीप बांदोडकर यांना उमेदवारी मिळाली आहे.

  • आरक्षित गट: ताळगाव (ST) मतदारसंघातून रघुवीर नारायण कुंकळकर यांना, तर केरी (SC) मतदारसंघातून नीलेश शंभा परवार यांना संधी मिळाली आहे.

  • इतर महत्त्वाच्या जागा: सुकूर मतदारसंघातून अमित देविदास आस्नोडकर, तर खोर्लीमधून सिद्धेश श्रीपाद नाईक यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय, पेन्‍ह-द-फ्रांका मतदारसंघातून संदीप दत्ताराम साळगावकर यांना संधी मिळाली आहे.

दक्षिण गोव्यातील स्थिती

दक्षिण गोवा जिल्हा परिषदेसाठी भाजपने पहिल्या टप्प्यात ६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

  • आरक्षण: उसागाव-गांजे (महिला) मतदारसंघातूनसमीक्षा वामन नाईक आणि कुर्टी (ST) मतदारसंघातून प्रितेश प्रेमानंद गावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • इतर जागा: शेल्‍डे (General) मतदारसंघातून सिधार्थ श्रीनिवास गावस देसाई, तर सांकवाळमधून (General) सुनील महादेव गावस यांना पक्षाने संधी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT