Arvind Kejriwal  Dainik Gomanatak
गोवा

'भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीसाठी मैदानात, जनतेनं जागृत व्हाव'

काँग्रेसला जे मतदान करणार आहेत ते अप्रत्यक्षपणे भाजपला मतदान करत आहेत त्यामुळे लोकांनी जागृत होणे गरजेच आहे

दैनिक गोमन्तक

भाजपचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्याचे ऐकले आहे, जेणेकरून ते नंतर भाजपमध्ये प्रवेश करू शकतील. त्यामुळे काँग्रेसला मतदान करण्यापेक्षा जनतेने आपला मतदान करावे. काँग्रेसला (Congress) जे मतदान करणार आहेत ते अप्रत्यक्षपणे भाजपला मतदान करत आहेत त्यामुळे लोकांनी जागृत होणे गरजेच आहे. अस मत आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मांडले आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टी (आप) गोवा प्रभारी आतिशी मार्लेना यांनी दावा केला आहे की आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाने षडयंत्र रचले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, भाजपने कॉंग्रेसच्या चिन्हावर आपले सात उमेदवार उभे केले आहेत आणि भाजप त्यांना निवडणूक (Election) लढवण्यासाठी आर्थिक मदत देखील करत आहे.

आतिशी म्हणाल्या की, भाजप सरकारच्या वाईट कारभारामुळे त्यांनी गोवावासीयांचा रोष ओढावून घेतला आहे. मागील निवडणुकीत भाजपला 40 पैकी 15 मतदारसंघांमध्ये देखील विजय मिळवता आलेला नाही आणि म्हणूनच यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसशी जुळवून घेतले आहे. काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे (BJP) माजी उमेदवार विजयी झाल्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा सरकार स्थापन करण्याचा भाजपचा 'मास्टर प्लॅन' आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT