मतभेद मिटले, रोयोलांचा टोनींना पाठिंबा

भाजपचे हे कारस्थान अल्पसंख्याक मतदारांनी लक्षात घ्यायला पाहिजे
Royala Fernandes
Royala FernandesDainik gomantak

मडगाव : काँग्रेसने बाणावलीत बाहेरचा उमेदवार दिला म्हणून बंड करण्याच्या पवित्र्यात असलेल्या प्रदेश समितीच्या सरचिटणीस रोयोला फेर्नांडिस यांनी आपले बंड मागे घेत आज काँग्रेस उमेदवार डायस यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

आज बाणावली (Benaulim) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या मतात विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपचे (BJP) छुपे भागीदार असलेल्या आप व तृणमूल यांना मिळू नये यासाठी सर्व काँग्रेसजनांनी आपआपले मतभेद विसरून एकत्र काम करण्याची गरज आहे. त्यासाठीच आपण काँग्रेस (Congress) उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Royala Fernandes
राहुल गांधींचा गोवा दौरा लांबणीवर

यावेळी रोडणी आल्मेदा व नाझारीयो पिंटो हेही उपस्थित होते. आल्मेदा यांनी यावेळी बोलताना, भाजप अल्पसंख्याकांची मते प्रत्यक्ष मागू शकत नाही, त्यामुळे त्यांनी आप आणि तृणमूल (TMC) यांना पुढे आणले आहे. या पक्षांना भाजपच निधी देते. भाजपचे हे कारस्थान अल्पसंख्याक मतदारांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी त्यामुळे काँग्रेस बरोबरच खंबीरपणे उभे राहण्याची गरज व्यक्त केली. यावेळी डायस यांनी जास्तीत जास्त काँग्रेस समर्थकांनी काँग्रेसच्या मागे उभे राहून काँग्रेसची शक्ती वाढवावी असे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com