Goa BJP Dainik Gomantak
गोवा

भाजपचा जाहीरनामा उद्या होणार प्रसिद्ध

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर गोव्यातील सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे भाजपचा जाहीरनामाही प्रसिद्ध होण्यास उशीर झाला.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजप आपला जाहीरनामा अखेर उद्या प्रसिद्ध करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते गोवा विधानसभेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. उद्या नितीन गडकरी उत्तर गोव्यात, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दक्षिण गोव्यात प्रचारसभा घेणार आहेत. (BJP will release manifesto on 8th February in goa )

भाजपच्या नेत्यांच्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला म्हापशातील जनतेला संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर गोव्यात आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दक्षिण गोव्यात प्रचारसभा घेणार आहेत

नितीन गडकरी आणि अमित शहा उत्तर गोव्यात जाहीर सभांना संबोधित करतील तर जेपी नड्डा 8 फेब्रुवारी 2022 रोजी दक्षिण गोव्यात जाहीर सभांना संबोधित करतील. तसेच राजनाथ सिंह 9 फेब्रुवारी 2022 रोजी दक्षिण गोव्यात जाहीर सभांना संबोधित करतील, भाजपचा जाहीरनामा हा काल म्हणजेच रविवारी जाहीर करण्यात येणार होता.

गोवा विधानसभेसाठी (Goa Assembly Election) आतापर्यंत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला जाणार होता मात्र ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर गोव्यातील सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. त्यामुळे भाजपचा (Goa BJP) जाहीरनामाही प्रसिद्ध होण्यास उशीर झाला. आता 8 फेब्रुवारी रोजी हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर आता भाजपच्या जाहीरनाम्यातून गोव्यातील जनतेसाठी कोणती आश्वासनं दिली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT