Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: पक्षनिष्ठा! कर्नाटकसाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची बॅटिंग... म्हणाले तिथेही पुन्हा भाजपच

गोवा आणि कर्नाटकमध्ये सध्या म्हादईच्या मुद्यावरून वाद रंगला आहे.

Pramod Yadav

गोव्याचे (Goa) शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Elections 2023) वारे वाहत आहेत. विधानसभेसाठी भाजप आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्ष राज्यात सत्तेचा दावा करत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्ष (BJP) राज्यात सत्ता पुन्हा प्राप्त करण्याबाबत अधिक विश्वास व्यक्त केला आहे.

कर्नाटकमध्ये पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी देखील सुरू केली. गोव्यात आणि कर्नाटकमध्ये सध्या म्हादईवरून वाद सुरू आहे. तरीही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी कर्नाटकमध्ये पुन्हा भाजप सरकारच येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

गोवा आणि कर्नाटकमध्ये सध्या म्हादईच्या मुद्यावरून वाद रंगला आहे. केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकचा सुधारीत DPR मंजूर केल्याने म्हादईचे पाणी वळविले जाणार आहे. याचा गोव्यातील अनेक तालुके आणि वन्यजीवांवर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळे गोव्यात राजकारण तापले आहे. असे असताना राज्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी पक्षनिष्ठा दाखवत कर्नाटकमध्ये देखील भाजपच्या विजयाचा दावा केला आहे.

फक्त डबल इंजिन सरकारच 'न्यू कर्नाटक' हे स्वप्न पूर्ण करू शकते. त्यामुळे पुन्हा कर्नाटकमध्ये भाजप आल्यास डबल इंजिन सरकार होईल. कॅनरा कल्चरल अकादमीचे (CCA) उद्घाटन केल्यानंतर एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले.

"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विचारातील नव्या भारताची उभारणी केली जाऊ शकते. पंतप्रधानांनी तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून 'स्वच्छ भारत ते फिट इंडिया' पासून कौशल्य विकास असे अनेक कार्यक्रम सुरू केले." असे सावंत म्हणाले.

यावेळी कॅनरा कल्चरल अकादमीचे विशेष टपाल तिकिटाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आयातशुल्काचा धक्का, भारतावर 25 टक्के कराची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, दंड देखील आकारणार

Rohan Harmalkar: जमीन हडप प्रकरण; रोहन हरमलकरची 212.85 कोटींची मालमत्ता 'ED'कडून जप्त

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

SCROLL FOR NEXT