Mopa Airport: मोपावरून येणाऱ्या प्रवाशांना दिलासा, एसी बसच्या भाडे दरात मोठी कपात; असे आहेत नवे दर

कंदब एसी इलेक्ट्रिक बसच्या भाडे दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Kadamba Electric Bus
Kadamba Electric BusDainik Gomantak
Published on
Updated on

Manohar International Airport: उत्तर गोव्यात नव्याने सुरू झालेल्या मोपा विमानतळवर येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने कदंब महामंडळ बससेवा सुरू केली.

बससेवा सुरू केली पण ही सेवा महाग असल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. कदंब बससेवेचे दर महाग असल्याचे कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी मान्य केले होते.

दरम्यान, मोपावरून येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली असून, कंदब एसी इलेक्ट्रिक बसच्या भाडे दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Kadamba Electric Bus
NAAC: गोव्यातील 'या' महाविद्यालयाला मिळाले नॅक समितीचे ‘ए’ मानांकन, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

जुने दर कसे होते?

मोपा - मडगाव - 500 रुपये,

मोपा - पणजी 250 रुपये

मोपा - म्हापसा 200 रुपये

असे आहेत नवे दर.

मोपा - मडगाव - 400 रुपये,

मोपा - पणजी 200 रुपये

मोपा - म्हापसा 150 रुपये

Kadamba Electric Bus
Anjuna Beach: युगांडाच्या दोन महिला ड्रग्ज विक्रीसाठी हणजुण बीचवर आल्या अन्...

दरम्यान, मोपातून थेट सासष्टीला जाण्यासाठी टॅक्सी शुल्क जास्त असल्याने कदंब महामंडळाची बस घेऊन प्रवास करण्याची सुविधा आहे, परंतु कदंब महामंडळाने दर जास्त ठेवल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.

पणजी ते मडगाव शटल बससेवा दर 50 रुपये असून मोपा ते मडगाव थोडा जास्त दर अपेक्षित होती. मात्र खूपच महाग ठेवल्याने जनतेकडून टीका होत होती. दरम्यान, दर कपात केल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

IndiGo Goa Delhi Flight Emergency Landing
Kadamba Bus Drivers Recruitment
Mopa Airport Link Highway Toll
Kadamba Interstate Bus Service
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com