BJP vs BJP Dainik Gomantak
गोवा

साळगावात निवडणूक रिंगणात भाजप विरुध्द भाजप

अपक्षांचीही मुसंडी: जयेश- केदार यांच्यात अटीतटीची लढत

दैनिक गोमन्तक

Goa Election (मिलिंद म्हाडगुत) : साळगाव हा उत्तरगोव्यातील एक महत्वाचा मतदारसंघ साळगाव. पिळर्ण, सांगोल्डा, नेरुल, गिरी या सहा ग्रामपंचायती या मतदारसंघात येतात. जयेश साळगांवकर हे या मतदारसंघाचे आमदार होते. 2017 साली ते गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर भाजपचे तत्कलिन मंत्री दिलीप परुळेकर यांचा पराभव करून निवडून आले होते. पण आता ते भाजपच्या (BJP) उमेदवारीवर निवडणूक (Goa Election) लढवित आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे साळगावातील अनेक भाजप कार्यकर्ते नाराज झालेले दिसताहेत.

काँग्रेस (Congress) उमेदवार केदार नाईक हे सुध्दा भाजपकडून उमेदवारी करता इच्छुक होते. पण जयेश साळगावकरांमुळे त्यांचा पता कट करण्यात आला. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन काँग्रेसची उमेदवारी पटकावली.त्यामुळे आता त्यांनी जयेश साळगावकरांपुढे जबरदस्त आवाहन उभे केले आहे. दुसऱ्या बाजूला अपक्ष रूपेश नाईक हेही या लढतीचा तिसरा कोन बनते आहेत. रुपेश हेही पूर्वभाजपवासी तेही भाजप उमेदवारांचा स्पर्धेत होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. ते पूर्व भाजपवासी असल्यामुळे भाजपच्या मतांवर परिणाम करू शकतात, जयेश यांना उमेदवारी दिल्यामुळे माजी मंत्री दिलीप परूळेकर हेही नाराज होते. पण त्यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. वर वर भाजपातील बंड शमले, असे वाटत असते तरी या बंडाची धग भाजप बघायला लागली आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते उघडउघड केदार नाईक यांच्याबरोबर फिरताना दिसत आहेत. (BJP vs BJP in Salgaon election arena)

साळगाव मतदारसंघाचा कानोसा घेतल्यास भाजप प्रवेश जयेश साळगावकर यांना महाग पडेल, अशीच चिन्हे दिसाताहेत. जयेश यांचे स्वतःचे असे समर्थक आहेत. पण जयेश साळगावकरांच्या भाजप प्रवेशामुळे तेही बुचकळ्यात पडल्यासारखे झाले आहेत. यामुळे सध्या तरी काँग्रेसचे पारडे जड झाल्यासारखे वाटायला लागले आहे. अर्थांत जयेश हेही कच्चे खिलाडी नसल्यामुळे ते यावर मात करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सध्या साळगावात काँग्रेसच्या मतांपेक्षा भाजपची अधिक मते आहेत. पण आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे काही मते काँग्रेसकडे वळू शकतात. आप तर्फे मारीया कार्देरो या रिंगणात असून त्यांच्या उमदेवारीचा काँग्रेसला फटका बसू शकतो. आरजी तर्फे रोहन कळंगुटकर हे उमेदवार असून त्यांचा विशेष प्रभाव दिसत नाही. तृणमूलने भोलानाथ घाडी यांना रिंगणात उतरविले आहे. पण तृणमूलची इथे शक्तीच नसल्यामुळे त्यांनी युतीचे पार्टनर मगोपच्या प्रचारावर विसंबून रहावे लागत आहे. एकंदरीत साळगावचे चित्र स्पष्ट नसले तरी काँग्रेस व भाजपा दोघांनाही 50-50 टक्के संधी आहे, असे दिसते. काँग्रेसची गोवा फॉरवर्डशी युती असल्यामुळे फॉरवर्डची मतेही काँग्रेसच्या पदरात पडू शकतात. आता कोण कोणावर मात करतो, आप व तृणमूल (TMC) कोणाला फटका देतात, याचे उत्तर 10 मार्चलाच मिळेल.

अन् साळगावकर-परूळेकर एकाच व्यासपीठावर !

केदार नाईक हे रेईश-मागुसचे सरपंच असल्यामुळे त्यांचा या भागातील पंच, सरपंचांशी चांगलाच संबंध आहे. त्याचाही लाभ त्यांना मिळताना दिसत आहे. साळगाव मतदारसंघ हा पूर्वी माजी मुख्यमंत्री विल्फेड डिसोजा यांचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असे. 2002 पर्यंत त्यांचेच साम्राज्य होते. पण 2007 साली भाजपच्या दिलीप परूळेकर यांचा दोन हजार मतांनी पराभव करून त्यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. 2012 साली परूळेकर पुन्हा विजयी होऊन मंत्री बनले, पण यावेळी त्यांना जयेश साळगांवकराचा प्रचार करावा लागला आहे. काल परवापर्यंत विरोधक असलेले आता एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. कालाय तस्मै नमः, म्हणतात तो हाच असावा, असे वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT