...त्यामुळे कामराभाटात काँग्रेस - भाजप गटात जुंपली

भरारी पथक व पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात
Congress vs BJP
Congress vs BJPDainik Gomantak

Panaji: मतदानाचा दिवस जसा जवळ येऊ लागला आहे, तसा प्रचाराचा जोरही वाढला आहे. प्रचारामुळे उमेदवारांचे समर्थक गटामध्ये ठिणग्या उडण्यास सुरवात झाली आहे. ताळगाव मतदारसंघातील संवदेशनशील अशा कामराभाट येथे आज सकाळी 11 च्या सुमारास काँग्रेसचे उमेदवार टोनी रॉड्रिग्ज (Tony Rodriguez) हे प्रचारास गेले असता त्यांच्या व भाजप समर्थक गटांमध्ये बाचाबाची होऊन जुंपली. त्या ठिकाणी उपस्थित पोलिस व गस्तीवरील भरारी पथकाने परिस्थितीवर नियंत्रण आणले.

Congress vs BJP
बॅलेटद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया गोव्यात सुरू

कामराभाट येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असून तेथील स्थानिक कार्यकर्ते टोनी बार्रेटो हे बाबूश मोन्सेरात यांचे खंदे समर्थक आहेत. या भागातील बहुतेक मते ही मोन्सेरात यांच्याकडे आहेत व या प्रभागातून पंचायतीवर त्यांचाच उमेदवार निवडून येतो. आज सकाळी टोनी रॉड्रिग्ज हे प्रचारासाठी या भागात फिरत होते. त्यांच्यासमोबत नगरसेवक उदय मडकईकर, दया कारापूरकर तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) 20 जणांनाच उमेदवारासोबत प्रचारास परवानगी दिली आहे त्याचे उल्लंघन करून काँग्रेसचे उमेदवार प्रचार करत असल्याची तक्रार भरारी पथकाला व पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे हे पथक व पोलिस पोहचताच रॉड्रिग्ज यांनी त्यांना येथे येण्यामागील विचारणा केली. यावेळी तेथील टोनी बार्रेटो व रॉड्रिग्ज यांच्या समर्थकांत जुंपली. मोन्सेरात यांना पाठिंबा असलेल्या टोनी बार्रेटो व तेथील काही स्थानिकांनी रॉड्रिग्ज यांच्या समर्थकांबरोबर हुज्जत घालण्यास सुरवात केली. यावेळी भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना बाजूला केले व परिस्थिती नियंत्रणात आणली. रॉड्रिग्ज यांना 20 समर्थकांपेक्षा अधिकजणांना प्रचारात सामील न करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली. मात्र काँग्रेसच्या या समर्थकांविरुद्ध कारवाई न केल्याने टोनी बार्रेटो यांनी संताप व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com