BJP victory in Casino Link Road and Mopa Airport affected areas Dainik Gomantak
गोवा

कसिनो, लिंक रोडसह मोपा विमानतळ ग्रस्त भागात भाजपची बाजी

सत्ताधारी भाजपच्या विरोधात मतदान होवून लोक आपला राग व्यक्त करतील असा सर्वसाधारण अंदाज होता

दैनिक गोमन्तक

पेडणे : मोपा विमानतळ परिसर व लिंक रोड परिसरात जी गाव आहेत, तिथे विमानतळ प्रकल्पामुळे अथवा लिंक रोडमुळे शेतकऱ्यांची जमीन, बागायतीची नुकसानी होत असल्याने त्याविरोधात लोक आंदोलन करत आहेत. आंदोलन कर्त्यावर पोलीसांनी लाठीचार्ज केलेला आहे. आंदोलन कर्त्यावर गुन्हे नोंदवलेले आहेत. सुकेकुळण धारगळ येथे कझिनोसाठी विरोध होत आहे. या पाश्वर्भूमीवर या भागात सत्ताधारी भाजपच्या विरोधात मतदान होवून लोक आपला राग व्यक्त करतील असा सर्वसाधारण अंदाज होता. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकिसाठी (Assembly Election) या परिसरात भाजपला सर्वात जास्त मते मिळालेली आहेत.

मतदान केंद्र क्रमांक 19 : उगवे ईस्ट भाजप 209, मगो 149, कॉंग्रेस (Congress) 38, गोवा रिव्होल्युशनरी 34.
मतदान केंद्र क्र. 20 उगवे नॉर्थ : भाजप 194,मगो 184,कॉंग्रेस 35, गोवा रिव्होल्युशनरी 35.
मतदान केंद्र क्र.26मोपा : भाजप 402, मगो 310,कॉंग्रेस 37, गोवा रिव्होल्युशनरी 37.
मतदान केंद्र क्र.27 नॉर्थ वारखंड : भाजप 206, मगो 156, कॉंग्रेस 43,गोवा रिव्होल्युशनरी 68.
मतदान केंद्र क्र.२८ साउथ : भाजप 281, मगो 158, कॉंग्रेस 8,गोवा रिव्होल्युशनरी 43.
मतदान केंद्र क्र.29: नागझर,शमेचे आडवण ,तुळसकरवाडी भाजप 315, मगो 151, कॉंग्रेस 110, गोवा रिव्होल्युशनरी 43.
मतदान केंद्र क्र. 42 कासारवर्णे साउथ : भाजप 202, मगो 141, कॉंग्रेस 24, गोवा रिव्होल्युशनरी 36.
मतदान केंद्र 43 कासारवर्णे इस्ट नॉर्थ भाजप 242, मगो 211, कॉंग्रेस 20, गोवा रिव्होल्युशनरी 12.

मतदान केंद्र क्र.44,चांदेल :- भाजप 416, मगो 254, कॉंग्रेस 26, गोवा रिव्होल्युशनरी 42. मतदान केंद्र क्र. 45, हसापुर : भाजप 363, मगो 249, कॉंग्रेस 24, गोवा रिव्होल्युशनरी 42.
धारगळ ग्रामपंचायत क्षेत्रात होउ घातलेल्या कसिनोला जोरदार विरोध होत होता. तर दाडाचीवाडी धारगळ मधील अनेक शेतकऱ्यांना लिंक रोड साठी बागायती व जमीन ताब्यात घेण्यात आली आहे.

धारगळ ग्रामपंचायत क्षेत्रात भाजप (BJP) 2,238, मगो 1,126, कॉंग्रेस 193, गोवा रिव्होल्युशनरी 527. त्यात दाडाचीवाडी मतदान केंद्र क्र.39 मध्ये बऱ्याच शेतकऱ्याची जमीन हि पोलीस (police) बळ वापरुन लिंक रोड साठी घेण्यात आली व येत आहे.अशा या पाश्वर्भूमीवर भाजपला नेत्रदिपक यश मिळाले असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT