arvind kejriwal goa Dainik Gomantak
गोवा

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

BJP Viral Post On Kejriwal: केजरीवाल यांच्या टीकेला गोवा काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले असतानाच, आता भाजपनेही केजरीवाल यांना घेरले आहे

Akshata Chhatre

पणजी: 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौऱ्यावर असताना भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर केलेल्या 'एका माळेचे मणी' या सडकून टीकेमुळे गोव्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. केजरीवाल यांच्या टीकेला गोवा काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले असतानाच, आता भाजपनेही केजरीवाल यांना घेरले आहे.

केजरीवाल यांच्या 'ऑडी' कारवरून भाजपचा हल्ला

केजरीवाल गोव्याच्या रस्त्यांवरून प्रवास करत असताना, भाजपने त्यांच्यावर थेट वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. गोवा भाजपने 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केजरीवाल यांच्या ऑडी (Audi) कारचा फोटो पोस्ट करत त्यांना टोला लगावला.

भाजपने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "गोव्यात तुमचे स्वागत आहे, मि. केजरीवाल! तुम्ही तुमच्या आलिशान ऑडीमधून फिरण्याचा, सुंदर हवामानाचा आणि आमच्या भाजपच्या डबल इंजिन सरकारने विकसित केलेल्या प्रभावी पायाभूत सुविधांचा आनंद घेत आहात, हे पाहून खूप छान वाटले. दुर्दैवाने, तुमचे सरकार दिल्लीत हे साध्य करू शकले नाही!"

केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा झटका

एकीकडे भाजप आणि काँग्रेसकडून टीका होत असतानाच, दुसरीकडे आम आदमी पक्षाला राज्यात मोठा धक्का बसला आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 'आप'ला, केजरीवाल राज्यात उपस्थित असतानाच दोन प्रमुख नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे.

दक्षिण गोव्यातील 'आप'चे दोन मोठे नेते, बाणावलीचे पॉल लोबो आणि सॅटरनिनो रॉड्रिग्ज यांनी समर्थकांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 'आप'चे विद्यमान आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्यासाठी हा राजीनामा एक मोठा धक्का मानला जात आहे. महत्त्वाच्या नेत्यांच्या या राजीनाम्यामुळे गोव्यात 'आप'च्या संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

'माझे पोलीस स्टेटमेंट माध्यमांमध्ये कसे लीक झाले'? रामा यांच्या पत्नीची पणजी पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

Goa Politics: 'आप'च्या राजकारणाची स्क्रिप्ट उघड! "छुपे साटेलोटे नेत्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत", काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

SCROLL FOR NEXT