भाजपच्या ‘त्या’ मंत्र्याला ‘लफडं’ भोवणार Dainik Gomantak
गोवा

भाजपच्या ‘त्या’ मंत्र्याला ‘लफडं’ भोवणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजप सरकारवर टाकलेला कथित लैंगिक अत्याचाराचा ‘बॉम्ब’ भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी भाजप सरकारवर (BJP Government) टाकलेला कथित लैंगिक अत्याचाराचा ‘बॉम्ब’ भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. एका मंत्र्यांवरील झालेल्या ‘सेक्स स्कॅंडल’च्या आरोपाला भाजपने गांभीर्याने घेतले असून काल कोअर कमिटीची बैठक वादळी झाली. अपेक्षेप्रमाणे या बैठकीमध्ये मंत्री आणि सदस्यांनी जोरदार आक्षेप नोंदवत संबंधित मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण आता दिल्ली पक्षश्रेंष्ठीकडे गेले असून त्यांच्याकडून कारवाईचे संकेत मिळत आहे. त्यामुळे या मंत्र्याला हे ‘लफडं’ भोवणार, अशी शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्याने भाजपला या प्रकरणाची मोठी किंमत मोजावी लागणार हे लक्षात आल्यानंतर प्रदेश कमिटीने तातडीच्या कोअर कमिटीची बैठक घेत हा विषय चर्चेला घेतला. या बैठकीत पक्षाच्या विविध नेत्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री माविन गुदिन्हो, माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी केली.

या प्रकरणातले अनेक पुरावे

व्हॉट्सॲप, चॅट, ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ क्लिप्स असे अनेक प्रकारचे पुरावे आज उपलब्ध झाले आहेत त्यामुळे संबंधित मंत्र्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. सध्या हे पुरावे अनेकांकडे असल्याने कारवाई शिवाय पर्याय नाही. हे पुरावे नष्ट करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असले असून त्यात मुख्यमंत्र्यांचा समावेश असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढते, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

दिवसभर चर्चेचा मुद्दा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी केलेल्या आरोपानंतर आज दिवसभर राज्यात अनेक मंत्र्यांकडे साशंकतेने पाहिले जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील बहुतांशी मंत्री त्रासलेले आहेत. कोण तो मंत्री, हाच विषय राज्यात चर्चिला जात आहे. याचा मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना त्रास होत असल्याचेही आज भाजपच्या बैठकीतून स्पष्ट झाले.

भाजप बलात्कारी पक्ष !

या अगोदर भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप झाले होते. आता हा पक्ष बलात्कारी झाला आहे, अशी प्रतिक्रिया विजय सरदेसाई यांनी दिली आहे. सरदेसाई हे बुधवारी रात्री दिल्लीतून गोव्यात परतले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. कॉंग्रेसबरोबरच्या युतीबाबत आपण समाधानी असून जागावाटपाचा मात्र अजून निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ हा नारा आहे. जर मंत्रिमंडळातील मंत्रीच महिलेचे शोषण करीत असेल तर जनतेने काय अपेक्षा धरावी. चोडणकर हे त्यात तथ्य आणि माहिती असल्याशिवाय, असे आरोप करणार नाहीत.

- रोहन खंवटे, आमदार

विद्यमान मंत्रिमंडळातील मंत्रीच जर महिलेचे शोषण करीत असेल तर हे गंभीर आहे, काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी मंत्र्यावर केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून त्यात तथ्यही असू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी.

- मायकल लोबो, मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT