Damu Naik Dainik Gomantak
गोवा

Damu Naik: सूत्रे स्वीकारली, आता आव्हानांची जबाबदारी! दामू नाईकांना सोडवावे लागणार 'हे' प्रश्न

Goa BJP: गेल्या दोन विधानसभांच्या कालावधीत तब्बल १८ आमदारांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये येताना त्यांनी आपले कार्यकर्तेही भाजपमध्ये आणले आहेत.

Sameer Panditrao

BJP party organization strengthening under Damu Naik

पणजी: भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे दामू नाईक यांनी स्वीकारल्यानंतर पक्षाचे जुने कार्यकर्ते राज्यभरात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन विधानसभांच्या कालावधीत तब्बल १८ आमदारांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये येताना त्यांनी आपले कार्यकर्तेही भाजपमध्ये आणले आहेत. त्यामुळे जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून त्यांच्यात संघर्ष होणार नाही, याची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी दामू यांच्यावर येऊन पडली आहे.

मडकई मतदारसंघातील भाजपचे प्रमुख नेते प्रदीप शेट यांनी भाजपने या मतदारसंघाला ३७० कलम लावल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवायची, तो निवडून आल्यानंतर भाजपच्या सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याचे आव्हान दामू यांना पेलावे लागणार आहे.

नुवे मतदारसंघाचे आमदार आलेक्स सिक्वेरा हे‌ भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य भाजपला मिळाले नव्हते. आताही त्या मतदारसंघात पुरेसे सदस्य नोंदले न गेल्याने भाजपला संघटनात्मक निवडणूक घेता आलेली नाही.

त्यामुळे सिक्वेरा यांना मंत्रिमंडळातून वगळावे, असा कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आहे. माजी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनीही सिक्वेरा यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. हा विषय हळूवारपणे हाताळण्याचे कौशल्य दामू यांना दाखवावे लागणार आहे.

भाजपने आता २०२७ मध्ये २७ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे दामू यांना मडकई आणि नुवेचा गुंता सोडवितानाच जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन घडून आणण्याचे कठीण काम लीलया पार पाडावे लागणार आहे. त्यातच त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे यश दडले आहे.

मडकईत पक्ष संघटना उभारणीत लागणार कस

याशिवाय मोठे आव्हान मडकई, नुवे, वेळ्ळी आणि बाणावली या मतदारसंघांत पक्ष संघटना बळकट करण्याचे आहे. विशेषतः मडकई मतदारसंघात जेथे यापूर्वी भाजपचा आमदारही निवडून आला होता त्या मतदारसंघात मंडळ अध्यक्षाची निवडणूक घेण्याइतपत मतदान केंद्र अध्यक्ष निवडून न येण्याची नामुष्की भाजपला पत्करावी लागली आहे. भाजपसोबत युतीत असलेल्या मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

संघर्ष टाळण्यासाठी शिकस्त

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या कार्यकाळात या विषयावर फारसे लक्ष देण्यात आले नाही. आमदारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना झुकते माप मिळत गेले. अलीकडे झालेल्या मतदान केंद्र आणि मंडळ अध्यक्ष निवडीतही आमदार समर्थकांचा वरचष्मा राहिल्याची चर्चा पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांत आहे. आता दामू प्रदेशाध्यक्षपदी आल्याने आपल्याला न्याय मिळेल, अशी भावना या जुन्या कार्यकर्त्यांत प्रबळ झाली आहे. त्यामुळे निर्माण होऊ शकणारा पक्षांतर्गत संघर्ष टाळण्यासाठी दामू यांना बरेच प्रयत्न करावे लागतील, असे दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT