Damu Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "ते खोटं बोलतायेत, त्यांना वारंवार समज दिली होती"; प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांचा गोविंद गावडेंना राजकारण न करण्याचा सल्ला

Damu Naik Responds To Govind Gaude: गोव्याच्या राजकारणात हलकल्लोळ उडवणाऱ्या माजी मंत्री गोविंद गावडे यांच्या आरोपांवर अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ठाम प्रत्युत्तर दिले.

Manish Jadhav

पणजी: गोव्याच्या राजकारणात हलकल्लोळ उडवणाऱ्या माजी मंत्री गोविंद गावडे यांच्या आरोपांवर अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ठाम प्रत्युत्तर दिले. नुकत्याच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गावडेंनी दामू नाईकांवर टीकेची झोड उठवली होती. “दामू नाईक यांच्यावर पक्ष कारवाई करणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. गावडेंच्या आरोपांवर आता दामू नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

'गोविंद गावडे निखालस खोटे बोलतात'

"गोविंद गावडे निखालस खोटे बोलतात. जेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर आरोप केले तेव्हा त्यांच्या म्हणण्याकडे गांभीर्याने पाहत मी स्वतः त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार होता. पक्षाने केवळ यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे या सगळ्यात राजकारण करुन त्यांनी लोकांची दिशाभूल करु नये," असे दामू नाईक (Damu Naik) म्हणाले.

गावडेंचे आरोप तथ्यहीन

दरम्यान, गावडे यांनी केलेल्या आरोपांमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खात्यात हस्तक्षेप केल्याचा दावा करण्यात आला होता. त्याचबरोबर दामू नाईक यांच्यावरही पक्षीय हितासाठी काम न केल्याचा आरोप त्यांनी केला होता. नाईक यांनी यावरही कठोर प्रतिक्रिया देत सांगितले की, "गावडेंनी केलेले आरोप तथ्यहीन असून पक्षाच्या अंतर्गत घडामोडींचा अपप्रचार करणे अयोग्य आहे."

गोविंद गावडेंची दामू नाईकांवर टीका

दुसरीकडे, गावडेंनी दामू नाईक यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. ज्या माणसाला आपल्या पदाचा ‘वालोर’ म्हणजे प्रतिष्ठा समजत नाही, ते माझ्याबद्दल बोलताना ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असे असभ्य शब्द वापरतात. अशा व्यक्तीविरोधात पक्ष काही कारवाई करणार आहे का? असा सवाल उपस्थित करत गावडे यांनी अप्रत्यक्षपणे दामू नाईकांच्या वक्तव्यावर रोष व्यक्त केला होता.

राजकीय वातावरण तापलं

दरम्यान, नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे गोवा भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गावडे यांना राज्य मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि आता दामू नाईक यांचं प्रत्युत्तर यामुळे सत्ताधारी पक्षात खदखद आहे. आता पुढे पक्ष शिस्तभंगाची कारवाई करतो का? की हा विषय याच टप्प्यावर थांबतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT