प्रेमानंद महांब्रे याची भाजपने घेतलेली पत्रकार परिषद Dainik Gomantak
गोवा

पुती गावकर यांच्या आरोपांचे भाजपकडून खंडन

मुख्यमंत्री (CM) डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचेच (BJP) सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: खाणबंदीला भाजप (BJP) जबाबदार नसून, उलट खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी भाजप सरकार आग्रही आहे. मुख्यमंत्री (CM) डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार तर खाण विषयी संवेदनशील असून, खाण विकास महामंडळाच्या माध्यमातून खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत (Pramod Sawant) यांचे सर्व ते प्रयत्न चालू आहेत.

भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद महांब्रे यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करून, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गोवा राज्य नवनिर्माण आघाडीचे स्वयंघोषित नेते पुती गावकर यांनी सरकारवर केलेल्या आरोपाचे खंडन केले. भाजप सरकार आणि मुख्यमंत्री सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. हा पुती गावकर यांचा आरोप म्हणजे जनतेची दिशाभूल आहे.

सरकारवर टिका करण्यापूर्वी गावकर यांनी अगोदर आपला राजकीय इतिहास तपासावा. खाणबंदी विषयी सरकारला दोष देणाऱ्या पुती गावकर यांनी खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न सोडाच, उलट त्यात आडकाठी आणण्याचेच काम केले आहे. असे प्रेमानंद महांब्रे यांनी म्हटले आहे. कोविड महामारीचा सामना करूनही सरकारची राज्याच्या प्रगतीसाठी योग्य दिशेने वाटचाल सुरु आहे. असेही महांब्रे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्य पाहूनच विरोधक भ्रमिष्ट झाले आहेत. असे गोपाळ सुर्लकर यांनी सांगून आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

डिचोली येथे दीनदयाळ भवनात मये, डिचोली आणि साखळी भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, महेश सावंत आणि गोपाळ सुर्लकर, भाजपच्या राज्य सरचिटणीस आरती बांदोडकर, डिचोलीचे प्रभारी संतोष मळीक, डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कार्बोटकर, साखळी भाजप मंडळाचे सरचिटणीस गुरुप्रसाद नाईक आणि ट्रक मालक संघटनेचे शिवानंद गावस उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT