दाबोळी: पुढील वर्षी गोव्यात (Goa) होणारी विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) वास्कोतून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निश्चितच विद्यमान आमदार कार्लुस आल्मेदा यांना देण्यात येणार आहे. कारण आल्मेदा यांच्या जवळ सर्व धर्मियांना घेऊन कार्य करण्याची क्षमता असल्याने वास्कोतुन पुन्हा एकदा भाजपचे आमदार आल्मेदा निवडून येतील अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार तथा वास्को भाजप प्रभारी विनय तेंडुलकर यांनी दिली.
वास्को (Vasco) भाजप (BJP) मंडळाच्या अल्पसंख्यांक विभाग निवडणूक निवड समितीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने राज्यसभा खासदार तेंडुलकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार कार्लुस आल्मेदा, वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, सरचिटणीस संदीप नार्वेकर, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, युवा मोर्चा अध्यक्ष अमेय चोपडेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यसभा खासदार म्हणाले की गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष (State President) सदानंद शेटतानावडे यांनी वास्को मतदारसंघात आमदार आल्मेदा यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. तसेच आल्मेदा यांनी 2012-2017 मध्ये वास्कोत विविध योजना राबवून चांगले कार्य केले आहे. आमदार यांनी येथील सर्व धर्मियांना घेऊन कार्य केले असल्याने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वास्कोत भाजपची उमेदवारी निश्चितच आमदार अल्मेदा यांना देण्यात येईल.
राज्यातील मतदारसंघात सर्वप्रथम राज्य भाजप समिती इच्छुक उमेदवारी चाचणी करून ती केंद्रीय भाजप समितीला पाठवून देणार आहे. नंतरच इच्छुक उमेदवारांची घोषणा करण्यात येईल अशी माहिती राज्यसभा खासदार तेंडुलकर यांनी दिली.
वास्कोचे आमदार (MLA) कार्लुस आल्मेदा म्हणाले की, वास्को भाजपची उमेदवारी आपणालाच मिळणार म्हणणारे माजी नगरसेवक (Former councilor) दाजी साळकर यांचे अक्षरशा वास्कोचे ग्राम देव दामोदर सप्ताहात घोटाळा करून भ्रष्टाचार भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच वास्कोतील कोमुनिदाद जमिन बेकायदेशीररित्या दिल्लीच्या जमीन मालकाला विकून करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याची माझ्याजवळ कागदपत्रे आहेत.
मी माझ्या कारकीर्दीत एकही घोटाळा केलेला नाही. माझ्या कार्यकाळात वास्कोतील युवकांना नोकर्या देण्यापासून अनेक प्रभागात विकास साधलेला आहे. गेल्या पालिका निवडणुकीत वास्कोतून उमेदवारांना निवडून आणले आहे. तसेच पालिका निवडणुकीत वास्कोतून उमेदवार म्हणून उभे राहिलेले सुद्धा आता भाजपासोबत आहे.
येत्या काही दिवसात महिला अल्पसंख्यांक विभाग समिती निवडण्यात येईल. यावेळी वास्को भाजप अल्पसंख्यांक विभागाची समिती निवडण्यात आली. अध्यक्ष समीर शेख, सरचिटणीस अर्नाल्ड डिसिल्वा, उपाध्यक्ष ट्रोय डायस, हिदायतुल्ला अत्तर, फ्लारीन सिल्वा, शाहरुख शेख, सजिद जाफर बागवाले, सिकंदर हलकेदी, कायतानी मास्कारेन्हस यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवेश आमोणकर तर आभार प्रदर्शन यतीन कामुर्लेकर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.