BJP Goa Dainik Gomantak
गोवा

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

Swadeshi campaign BJP: येत्या २५ डिसेंबरपर्यंत राज्यात आत्मनिर्भर भारत संकल्पांतर्गत भाजपने राज्यस्तरीय रथयात्रा व जिल्हास्तरीय पदयात्रांचे आयोजन केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: येत्या २५ डिसेंबरपर्यंत राज्यात आत्मनिर्भर भारत संकल्पांतर्गत भाजपने राज्यस्तरीय रथयात्रा व जिल्हास्तरीय पदयात्रांचे आयोजन केले आहे. याशिवाय मतदारसंघनिहाय मेळावे घेत स्वदेशीचा नारा बुलंद केला जाणार आहे.

राज्यभरातील दोन लाख जणांकडून स्वदेशी वस्तू वापरणार अशी संकल्प पत्रे भरून घेतली जाणार आहेत. प्रश्नमंजुषा, निबंध, रिल तयार करणे आदी स्पर्धांच्‍या माध्यमातून स्वदेशीचा विचार युवा वर्गाकडे नेला जाणार आहे. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष समीर मांद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती निवडण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यावेळी आमदार संकल्प आमोणकर, भाजपचे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, दक्षिण गोवा जिल्हा उपाध्यक्ष रणजितसिंह राणे, आणि समीर मांद्रेकर उपस्थित होते.

सावईकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड काळानंतर ‘आत्मनिर्भर’चा नारा दिला होता. आता १५ ऑगस्टला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भरला स्वदेशीची जोड दिली आहे.

स्वदेशीचा विचार प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी २५ सप्टेंबर या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीपासून २५ डिसेंबर या अटलबिहारी वाजपेयी जयंतीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभरात केले जाणार आहे. त्याचा भाग म्हणून राज्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

पदयात्रा, रथयात्रेसाठी आमदार केदार नाईक, गावकर, राणे आदींचा समावेश असलेली समिती निवडली आहे. या कार्यक्रमांतर्गत युवा ॲम्बेसेडर नियुक्त केले जाणार आहेत. मडगाव, वास्कोसह इतर ठिकाणी स्वदेशी मेळावे आयोजित करून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध केली जाणार आहे. -नरेंद्र सावईकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT