
पणजी: राजधानी पणजीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मुंबई लाईन बसस्थानकाजवळ बुधवारी (8 ऑक्टोबर) एका 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नियंत्रण कक्षाला मध्यरात्री एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले, मात्र तपासणीअंती तरुणी मृतावस्थेत आढळल्याने पणजी पोलिसांनी याची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीची ओळख पटली असून तिचे नाव प्रमिला साय (वय 22) असे आहे. ती मूळची छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुर्गुजा जिल्ह्यातील लालाटी येथील रहिवासी आहे. प्रमिलाची मैत्रीण तरमणी रामनंदन हिने तिची ओळख पटवली. दुसरीकडे, पोलिसांनी घटनेची प्राथमिक नोंद केल्यानंतर मृतदेह 108 आपत्कालीन सेवेद्वारे गोवा वैद्यकीय महाविद्यालय (Goa Medical College and Hospital), बांबोळी येथे हलवण्यात आला. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला 'मृत अवस्थेत आणण्यात आले' (Brought Dead) असे घोषित केले.
पोलिसांनी सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळलेला नाही, अशी माहिती दिली. तथापि, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पोस्टमार्टम रिपोर्ट (Post-mortem Report) प्रतीक्षा आहे. पणजी पोलीस (Police) ठाण्यात हा धक्कादायक प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून भारतीय न्याय संहिता कलम 194 अन्वये नोंदवण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.