BJP in Ponda
BJP in Ponda Dainik Gomantak
गोवा

'त्या' भाजपच्या फोंड्यातील बैठकीत कार्यकर्ते एकमेकांत भिडले

दैनिक गोमन्तक

फोंडा: विधानसभा निवडणूक आता जवळ येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. तिकिट वाटपासाठी राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांची नाराजी आणि रोषाला सामोरे जाण्याची वेळ बहुतांश नेत्यांवर आली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (BJP) तर मोठ्या रोषाला सामोरे जावे जात आहे. (BJP Party worker in Ponda, Goa)

त्याची प्रचिती बुधवारी फोंड्यात (Ponda) आली. भाजपने संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला. सुभाष फळदेसाई आणि सावित्री कवळेकर यांचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. गोव्यात भाजपमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडला.

फोंड्यातील सनग्रेस गार्डन सभागृहात ही उमेदवारांची निवड चाचणी चालली होती. या निवडीसाठी प्रत्येक मतदार संघातील बूथ कार्यकर्ते व इतर समिती सदस्यांकडून आपल्याला हव्या असलेल्या उमेदवाराला पसंती देण्यासाठी मतदान करण्यास सांगितले होते. मात्र, सांगे (Sanguem) मतदारसंघाची पाळी येताच संभाव्य उमेदवार सुभाष फळदेसाई आणि बाबू कवळेकर यांची पत्नी सावित्री कवळेकर यांच्यात व कार्यकर्त्यांत वाद झाला. सावित्री कवळेकर यांनी आणलेल्या काही समर्थक बूथ कार्यकर्त्यांना सांगे मतदारसंघात मतदानच नसल्याचा दावा फळदेसाई समर्थकांनी केला.

दरम्यान, भाजपच्या या उमेदवार निवड प्रक्रियेला गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपात सुंदोपसुंदी चालली असून उमेदवारी मिळवण्यासाठी एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रकार खुलेआम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे फोंड्यातील या खास उमेदवार निवड कार्यक्रमापासून पत्रकारांना लांबच ठेवण्यात आले होते.

पक्षासमोर आव्हान

निवड चाचणीदरम्यान आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. मतदान बॉक्स हिसकावण्याचा प्रयत्न झाला. शेवटी प्रकरण मिटत नसल्याने या मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी त्यांना पणजी भाजपा मुख्यालयात बोलावण्यात आले. दरम्यान, आम्हाला बैठकीसाठी बोलविण्यात आले होते. रितसर बैठक झाली. यावेळी कोणताही गोंधळ झाला नाही अशी प्रतिक्रिया भाजपच्या सावित्री कवळेकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT