Pallavi Dempo, Shripad Naik And Ramakant Khalap, Viriato Fernandes  Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Election 2024 Result: उरले दिवस फक्त पाच... कमळ की हात, गोव्यात कोण बाजी मारणार?

Goa Loksabha Election 2024 Result: गोव्यातील यावेळची लोकसभा निवडणूक फारच चुरशीची झाली, यामुळे भाजप आणि काँग्रेस (इंडिया आघाडी) यांच्यात लढत होत आहे.

Pramod Yadav

Goa Loksabha Election 2024 Result

देशभरातील लोकसभा निवणुकीसाठी होत असलेल्या मतदानाचा आता केवळ एकच टप्पा बाकी असून, लगेचच चार जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. ऐतिहासिक निवडणूक असा गाजावाजा झालेल्या या निवडणुकीच्या निकालाबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत.

देशभरात 543 जागांसाठी झालेल्या मतदानात गोव्यातील दोन जागांचा समावेश आहे. गोव्यात यावेळी समिश्र वातावरण पाहायला मिळाले, मात्र वाढलेल्या मतदानाचा भाजपला फायदा होतो का? हे येत्या चार तारखेला स्पष्ट होईल.

प्रमुख लढतींकडे लक्ष

गोव्यात यावेळी भाजप विरुद्ध काँग्रेस (इंडिया आघाडी) अशी थेट लढत होत असली तरी रेव्हॉल्युशनरी गोवन पक्ष कोणाची मते फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांना सहाव्यांदा भाजपने उमेदवारी दिली असून, भाऊ एक लाख मताधिक्याने विजयी होतील असा दावा मुख्यमंत्री सावंत यांच्यासह सर्व नेते करत आहेत. तर, काँग्रेसने यावेळी माजी मंत्री रमाकांत खलप यांना इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून पसंती दिलीय. खलप देखील 30 ते 40 हजार मताधिक्याने विजयी होतील असे काँग्रेस नेते म्हणत आहेत.

आरजीचे मनोज परब यावेळी उत्तरेतून निवडणूक रिंगणात उभे असून, त्यांनी विजयाचा दावा केला नसला तरी त्यांना पडणारी मते भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या विजय किंवा पराभवात निर्णायक ठरणार आहेत.

सर्वांचे दक्षिणेत लक्ष

दक्षिण गोव्यात यावेळी भाजपने नवा प्रयोग करत उद्योजक पल्लवी धेंपे यांच्या रुपाने महिला उमेदवार रिंगणात उभा केला आहे. धेंपे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक असून, गोव्यात देखील धेंपे घराण्याचे मोठे प्रस्थ आहे.

भाजपने यावेळी सर्वात जास्त लक्ष दक्षिणेत घालत धेंपे यांच्या प्रचारासाठी मोठी यंत्रणा उभी केली. शिवाय नरेंद्र मोदी यांची सभा देखील दक्षिणेतच घेण्यात आली.

त्यांच्याविरोधात काँग्रेसने यावेळी कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना संधी दिलीय. विरियातो यांचा कारगिल युद्धाती सहभाग ते दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा याचे भांडवल करताना काँग्रेस दिसून आली. फ्रान्सिस सार्दिन यांना वगळून विरियातो यांना दिलेली उमेदवारी काँग्रेसला फायदेशीर ठरणार का याचा फैसला येत्या चार तारखेलाच होईल.

आरजीकडून दक्षिण रुबर्ट परेरा निवडणूक लढत आहेत. उत्तरे प्रमाणे दक्षिणेत देखील आरजीच्या उमेदवार पडणाऱ्या मतांचा निकालावर काहीसा फरक पडताना दिसेल असे जाणकार सांगतात.

गाजलेले मुद्दे

गोव्यात यावेळी भाजपने काँग्रेसच्या खलप यांच्याशी संबधित म्हापसा अर्बन बँकेचा घोटाळा बाहेर काढत टीका केली. तर, दक्षिणेत विरियातो यांनी गोव्यावर भारतीय संविधान लादण्यात आल्याचे वक्तव्य केल्याने वादंग झाला.

काँग्रेसने देखील भाजपच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे काढत चौफेर टीका केली. यासह भाऊंच्या कार्यक्षमेतवर तर पल्लवी धेंपे यांच्या उद्योजक पार्श्वभूमी आणि अनुभव नसल्याच्या मुद्याचे भांडवल केले.

मोदी शहांच्या सभा

भाजपने दोन्ही उमेदवारांसाठी दक्षिण आणि उत्तर गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या यांच्या सभा घेतल्या. याउलट काँग्रेसच्या शशी थरुर, अलका लांबा यांनी गोव्यात प्रचारसभा घेतल्या मात्र, पक्षाचे मोठे नेते राज्यात फिरकले देखील नाहीत. भाजपला मोदी शहांच्या सभा फायदा तर काँग्रेसला मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा न झाल्याचा तोटा होणार का? हे येत्या चार जूनला स्पष्ट होईल.

इंडिया आघाडी

गोव्यात इंडिया आघाडीत आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस एकत्र लढत आहेत. याचा आघाडीच्या उमेदवाराला दक्षिण अधिक फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्न शक्य नाही माहिती असतानाही महिला संमतीने शारीरिक संबंधात असल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही; हायकोर्ट

Navratri Colours 2025: नवरात्र सुरु व्हायला काहीच दिवस बाकी! 9 दिवसांचे 9 रंग जाणून घ्या; शॉपिंगला सुरुवात करा

Horoscope: झटपट श्रीमंत होण्याची संधी! 'या' राशींसाठी मंगळाचे गोचर ठरणार 'वरदान'; मात्र काही लोकांनी राहावे सावधान

Goa Live Updates: हनुमान विद्यालयात सॅनिटरी पॅड इनसिनिरेटर व डिस्पेन्सर मशीनचे उद्घाटन

Marcel: माशेल मांस मार्केटवर जीवघेणं छप्पर! ग्राहक- विक्रेत्यांची जीवघेणी कसरत; तातडीने दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT