Goa BJP  Dainik Gomantak
गोवा

कुडतरीत भाजपतर्फे एसटी मोर्चा अध्यक्ष अँथनी बार्बोजा यांना उमेदवारी

आम्ही कुडतरीत आमचा उमेदवार उभा करणार, असे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी जाहीर केले होते.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कुडतरी भाजप गट अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड याना पाठिंबा देणार की, आपला स्वतःचा उमेदवार उभा करणार यातील सस्पेन्स आज भाजपने (BJP) संपविला. या मतदारसंघात भाजपने एसटी मोर्चा अध्यक्ष अँथनी बार्बोजा यांना शेवटी उमेदवारी दिली.

या निवडणुकीत भाजप रेजिनाल्ड यांना पाठिंबा देणार, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आम्ही कुडतरीत आमचा उमेदवार उभा करणार, असे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी जाहीर केले होते. मात्र ही घोषणा करूनही उमेदवार जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला होता. आपल्याला उमेदवारी जाहीर केल्यामुळे बार्बोजा यांनी पक्षाचे आभार मानले. कुडतरीत भाजप कार्यकर्त्यांची संख्या बऱ्यापैकी असून या निवडणुकीत (Goa Elections 2022) आपण निश्चितच चांगली कामगिरी करू, असा विश्वास बार्बोजा यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT