B L Santosh Visit Goa Dainik Gomantak
गोवा

भाजपच्‍या नव्‍या मुख्‍यालयाचे आत्तापर्यंत 90 टक्‍के काम पूर्ण; राष्‍ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी घेतला आढावा

BJP Merces Headquarters: मेरशी येथे उभारण्‍यात येत असलेल्‍या प्रदेश भाजपच्‍या नूतन इमारतीचे ९० टक्‍के काम पूर्ण झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मेरशी येथे उभारण्‍यात येत असलेल्‍या प्रदेश भाजपच्‍या नूतन इमारतीचे ९० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. आवश्‍‍यक त्‍या सर्व परवानग्‍या घेतल्‍यानंतर मुख्‍यालय इमारतीचे उद्‍घाटन करण्‍यात येईल, असे भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी रविवारी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व इतर पदाधिकाऱ्यांसोबत मुख्‍यालयाच्‍या इमारतीची पाहणी केली व कामाचा आढावा घेतला.

त्‍यानंतर बोलताना, मुख्‍यालय इमारतीचे ९० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. उद्‍घाटनाची तारीख अजून निश्‍चित झालेली नाही. काम पूर्ण झाल्‍यानंतर आवश्‍‍यक त्‍या परवानग्‍या घेऊन इमारतीचे उद्‍घाटन करण्‍यात येईल, असे नाईक यांनी सांगितले.

ऑगस्‍टमध्‍ये करणार उद्‌घाटन : श्रीपाद

येत्‍या १५ ऑगस्‍टच्‍या आसपास या नव्‍या मुख्‍यालयाचे उद्‍घाटन करण्‍यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या हस्‍ते इमारतीचे उद्‍घाटन व्‍हावे, अशी आमची इच्‍छा आहे. काम पूर्ण झाल्‍यानंतर त्‍यांना निमंत्रण देण्‍यात येईल, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Ketu Yuti 2026: सूर्याचं राशी परिवर्तन अन् केतुचा महासंगम! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

VIDEO: 'मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...', भारतीय बॉक्सरनं सांगितला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा; PM मोदीही हसून-हसून लोटपोट

संसदेत राडा! महिला खासदारानं पंतप्रधानांवर फेकली अंडी; म्हणाली, "तुम्हाला लाज वाटली पाहिजे..." Watch Video

Cricket Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! विजयी शॉटनंतर बॅट घेऊन प्रतिस्पर्ध्यावर धावला फलंदाज; इतर खेळाडू नसते तर... व्हिडिओ व्हायरल

Lucky Zodiac Signs 2026: कामाचा ताण अन् नव्या जबाबदाऱ्यांचं आव्हान! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीचं नशीब घेणार वळण; मेहनतीचं फळ लगेच मिळणार नाही

SCROLL FOR NEXT