BJP MLA Babush Monserrate in high court in job sacm case  Dainik Goamnatk
गोवा

नोकरभरती घोटाळाप्रकरण मोन्सेरात उच्च न्यायालयात, तर काँग्रेसही आक्रमक

नोकरभरती घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांनी आज दिला आहे.

दैनिक गोमन्तक

सार्वजनिक बांधकाम खात्यातील (PWD) नोकरभरती घोटाळाप्रकरणी (JOB Scam) मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांनी आज दिला आहे. मोन्सेरात यांनी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, आमदार टोनी फर्नांडिस यांच्यासोबत पत्रकारांशी बोलताना नोकरभरती प्रकरणात शनिवारी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. आणि आताही त्यांनी नोकरभरती प्रकरणाचा पाठपुरावा करणे सुरू ठेवले आहे . सरकारात असूनही तुम्ही नोकर भरतीप्रकरणी संतप्त का झालात, असा प्रश्न केला असता, आम्ही वस्तुस्थिती सरकारसमोर न ठेवल्यास सर्वसामान्य जनता त्या विषयावर आवाज उठवेल का? असे ते म्हणाले. नोकर भरतीप्रकरणी जनतेकडून पुरावे, तक्रारी येणे अपेक्षित आहेच, शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरी देण्यासाठी लाच मागितली जात असल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनीही बोलले पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे. (BJP MLA Babush Monserrate in high court in job sacm case)

तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्यातील पदांची लाखो रुपयांना विक्री केली आहे. नोकरभरतीमध्ये सुमारे 70 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यासंदर्भातील पुरावे असल्याचा भांडाफोड सत्ताधारी पक्षाचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केल्यानंतर मंत्री दीपक पाऊसकर यांनी या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे सांगलीतले आहे . आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी केले आहे. मोन्सेरात यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांची निवड न झाल्याने ते असे आरोप करत आहेत, असा पलटवार पाऊसकर यांनी केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर नोकरभरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यावरून सत्ताधारी मंत्री व आमदारांवर गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र मौन बाळगले आहे. या घोटाळ्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी गोवा फॉरवर्डने केली आहे. त्यामुळे निवडणूक तोंडावर असताना भाजप सरकारला नोकरभरती प्रक्रियेच्या या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.

नोकरभरती प्रक्रियेत मोठा घोटाळा सुरू असल्याचे काँग्रेसने सर्वप्रथम उघड केले होते. त्याचा आता सत्ताधारी आमदारांनीच भांडाफोड केला आहे. त्यामुळे काँग्रेसने केलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे. हे सरकार भ्रष्ट आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी काँग्रेसतर्फे १३ डिसेंबरला दक्षता खात्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी पत्रकार परिषदेला वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, ह्रदयनाथ शिरोडकर, महेश म्हांबरे उपस्थित होते.

राज्यात एकापाठोपाठ एक घोटाळे बाहेर पडत आहेत. त्यामुळे युवा पिढीने भाजप सरकारवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन काँग्रेसने यापूर्वीच केले होते. नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक करण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. प्रत्यक्षात या नोकऱ्यांचा लिलाव करण्यात आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. सत्ताधारी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी याप्रकरणी सरकारचेवाभाडे काढले आहेत. हे प्रकरण गंभीर असूनही सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नाही हे दुर्दैवी आहे, अशी टीका पणजीकर यांनी केली.

सरकारने स्पष्टीकरण द्यावे

पीडब्ल्यूडी खात्यातील पदांसाठी उमेदवारांची यादी निश्‍चित होऊनही ती दोन दिवस सरकारने ठेवून घेतली. त्यामध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांची नावे नसल्याने ती घोषित केली नाही. त्यानंतर ती शनिवारी घोषित केल्यावर ज्यांनी शिफारशी केल्या होत्या, त्यांच्या उमेदवारांची नावे नसल्याने या घोटाळ्याचा पर्दाफाश सत्ताधारी आमदारांनीच केला. त्यामुळे सरकारला त्यांच्या आमदारांना स्पष्टीकरण देणे भाग पडणार आहे, असे काँग्रेस युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT