Ponda Municipality Election 2023 Dainik Gomantak
गोवा

Ponda Muncipality Election 2023 : फोंड्यात भाजप, मगो, कॉंग्रेस सज्ज; एकूण उमेदवार 41 वर

फोंडा पालिकेतील बहुतांश विद्यमान, माजी नगरसेवकांनी अर्ज दाखल केला आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा पालिकेवर झेंडा फडकाविण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही आपले उमेदवार उतरवले आहेत. मात्र, मगो पक्षाच्या समविचारी समर्थकांनी यावेळेला वैयक्तिकरीत्या उमेदवारी अर्ज सादर केले. सोमवारी 32 जणांनी उमेदवारी अर्ज सादर केल्याने एकूण संख्या 41 इतकी झाली आहे.

मंगळवारी उमेदवारी सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नेमके कितीजण इच्छुक आहेत, ते स्पष्ट होईल. आतापर्यंत फोंडा पालिकेतील बहुतांश विद्यमान, माजी नगरसेवकांनी अर्ज दाखल केला आहे. काहीजणांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांनी आपल्या कन्या, पत्नींना निवडणुकीत उतरविले आहे.

सोमवारी दाखल झालेले अर्ज

रॉय रवी नाईक (प्रभाग १), राजेंद्र नारायण नागवेकर (प्र. १), राजेश प्रभाकर तळावलीकर (प्र. २), वीरेंद्र ढवळीकर (प्र. २), ज्योती अर्जून नाईक (प्र. ३), शेरील डिसोझा (प्र. ३), वेरोनिका डायस (प्र. ३), संदीप घाडी आमोणकर (प्र. ४), नारायण मणेरकर (प्र. ४), रितेश रवी नाईक (प्र. ५), श्रावण सत्यवान नाईक (प्र. ५), सुशांत कवळेकर (प्र. ५), लेविया फर्नांडिस (प्र. ६), शौनक बोरकर (प्रभाग ६), विश्‍वनाथ दळवी (प्र. ७), विद्या नीतीन नाईक (प्र. ८), सोनाली सुदेश नाईक (प्र. ८), व्हिन्सेंट पॉल फर्नांडिस (प्र. ९), निशांत आर्सेकर (प्र. ९), रूपक शंभू देसाई (प्रभाग ९), मनस्वी मामलेदार (प्र. १०), दीपा शांताराम कोलवेकर (प्र. १०) पूजा नाईक (प्रभाग १०), प्रियंका शेट पारकर (प्र. ११), शुभलक्ष्मी शैलेंद्र शिंक्रे (प्र. ११), विराज पुरुषोत्तम सप्रे (प्र. १२), सांतान कार्दोझ (प्र. १२), आशित वेरेकर (प्र. १२), विद्या पुनाळेकर (प्र. १३), दर्शन नाईक (प्र. १३), आनंद नाईक (प्र. १४), संपदा किशोर नाईक (प्र.१५)

रॉय-रवी रिंगणात

रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र रितेश व रॉय निवडणूक रिंगणात उतरले आहेत. रितेश हे नगराध्यक्ष आहेत. ‘वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात आपण अनेक कामे मार्गी लावली. काही सुरू झाली तर काही सुरू व्हायची आहेत’, असे रितेश नाईक यांनी सांगितले.

रॉय यांना गतनिवडणुकीत व्यंकटेश नाईक यांच्याकडून पराभव चाखावा लागला होता. तर भाजपचे कार्यकर्ते विश्‍वनाथ दळवी यंदा हॅट्‍ट्रिकच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळेला दळवी यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

लेक माझी लाडकी!

फोंड्याचे माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी आपली कन्या प्रतीक्षा नाईक, माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांनी आपली कन्या संपदा नाईक तर माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिंक्रे यांनी आपली कन्या शुभलक्ष्मी शिंक्रे हिला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या प्रभागात महिला राखीव असल्याने तिघानींही आपल्या कन्यकांना प्राधान्य देणे ठीक समजले.

काँग्रेसचे राजेश वेरेकर यांचे पॅनेल

काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनीही आपले पॅनेल बनवले असून सध्या तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्यात विराज सप्रे, लिविया फर्नांडिस आगियार व शुभलक्ष्मी शिंक्रे यांचा समावेश आहे. मंगळवारी शेवटच्या दिवशी अन्य उमेदवार अर्ज सादर करतील, असे राजेश वेरेकर म्हणाले.

विद्यमान नगरसेवक विलियम आगियार यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांनी आपली पत्नी लिविया हिला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. फोंड्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठी यावेळेला नव्या दमाच्या उमेदवारांना निवडून आणण्याची गरजही राजेश वेरेकर यांनी व्यक्त केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

Goa Water Supply: '2047 पर्यंत आवश्यक पाण्याची तजवीज 2 वर्षांत करणार', जलसंपदा मंत्री शिरोडकरांचा दावा

Goa Crime: चिंताजनक! गोव्‍यासह देशभरात महिलांवरील अत्‍याचारांत वाढ; NCRBच्या अहवालातून माहिती उघड

Goa Rain: ..लो मैं आ गया! पुन्हा पावसाची वापसी, विजांसह कोसळणार सरी; 2 दिवस यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT