Mormugao Muncipal Council : मुरगाव पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; निवृत्ती वेतनधारक व कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

वढी मोठी रक्कम कशी व कोठून आणावी, पालिकेसमोर प्रश्न
Murmugao muncipal council
Murmugao muncipal councilDainik Gomantak

मुरगाव पालिकेच्या तिजोरीत खडखडाट पडल्याने कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक व रोजंदारीवरील कामगार यांचे मार्च महिन्याचे वेतन अजूनही मिळालेले नाही. ‘अ’ वर्गाच्या पालिकेच्या तिजोरीत खडखडाट पडण्यामागील कारण काय असावे, याबाबत येथे उलटसुलट प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहेत.

पालिकेची जी थकबाकी आहे, ती वसूल करण्याची गरज आहे. तथापि काही वेळा मोहीम राबविली जाते. गरजेपुरती थकबाकीची रक्कम वसूल झाली की पुन्हा सामसूम होते, असे चित्र आहे. आपले महिन्याचे वेतन कधी हातात पडेल, याची वाट कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना पाहावी लागते.

Murmugao muncipal council
Goa News : सरकारी कर्मचाऱ्यांना महिला व बालविकास संचालनालयाचा दणका; 68 लाख वसूल

ऑक्ट्रॉय बंद

मुरगाव पालिकेला मिळणारा ऑक्ट्रॉय बंद झाल्याने मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. पूर्वी ऑक्ट्रॉयच्या रूपाने मुरगाव पालिकेला सुमारे सहा कोटी रुपये वर्षाकाठी मिळत होते. परंतु सरकारने आपल्याकडे ऑक्ट्रॉय वळता केल्याने मुरगाव पालिकेसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

रक्कम कोठून आणावी?

कर्मचारी वर्गासाठी 70 लाख, निवृत्ती वेतनधारकांसाठी अंदाजे 14 लाख, रोजंदारी कामगारांसाठी अंदाजे 15 लाख रुपये असे सुमारे 99 लाख रुपये वेतनापायी मुरगाव पालिकेला महिन्याकाठी लागतात. परंतु सध्या मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने एवढी मोठी रक्कम कशी व कोठून आणावी, हा प्रश्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com