Sankhlim Municipality Election 2023 : साखळीत मुख्यमंत्र्यांचा दबदबा; उमेदवारीसाठी आज शेवटची मुदत

साखळी पालिकेसाठी एकूण 31 अर्ज; शनिवारपर्यंत केवळ ८ अर्ज दाखल झाले होते
Sankhlim Municipality Election 2023
Sankhlim Municipality Election 2023Dainik Gomantak

Sankhlim Municipality Election 2023: साखळी पालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गती येताना (सोमवारी) 23 अर्ज दाखल झाले होते. शनिवारपर्यंत केवळ 8 अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे कालपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांचा आकडा 31 झाला आहे. आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

सोमवारी एकाच दिवशी एकूण 23 अर्ज दाखल झाले. माजी नगराध्यक्ष यशवंत माडकर, सुनीता वेरेकर यांच्यासह मावळते नगरसेवक राजेंद्र आमेशकर, ब्रह्मानंद देसाई आणि कुंदा माडकर यांनी आज अर्ज भरले. प्रवीण ब्लेगन यांनी दोन प्रभागातून अर्ज भरले. सहायक निवडणूक अधिकारी राजाराम परब यांच्याकडे उमेदवारांनी अर्ज सादर केले.

Sankhlim Municipality Election 2023
Bicholim Crime News : डिचोलीतील युवतीचा विनयभंग; पोलिसांत तक्रार केल्यास मारण्याची धमकी

सोमवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार असे : प्रभाग-१ सुयश माडकर, यशवंत माडकर, कुंदा माडकर, गीतेश माडकर.प्र.-२ निकिता नाईक, ईशाकुमार सगलानी.प्र.-३ सिद्धी पोरोब, सुनीता वेरेकर.प्र.-४ ओंकार फुलारी.प्र.-५ सुविधा पेडणेकर, प्रवीण ब्लेगन. प्र.-६ सरोज देसाई, संचिता सालेलकर. प्र.-७ ब्रह्मानंद देसाई, संपतराव प्रभूदेसाई, पार्वती गावकर आणि राजेंद्र पोसनाईक. प्र.-८ प्रवीण ब्लेगन. प्र.-१० राजेंद्र आमेशकर. प्र.-११ रश्मी घाडी, दीपा जल्मी.प्र.- अंजना कामत आणि आश्विनी कामत.

Sankhlim Municipality Election 2023
Mormugao : ‘एमपीए’त क्रूझ पर्यटन सुरू करा; गोवा फॉरवर्डची मागणी

साखळीत मुख्यमंत्र्यांचा दबदबा

यापूर्वी साखळी पालिकेची सत्ता प्राप्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक अयशस्वी प्रयत्न केले. हे शल्य भरून काढण्यासाठी त्यांनी सुरवातीपासूनच सत्ता स्थापनेसाठी व्यूहरचना आखलेली दिसते.

दुसरीकडे रियाज खान आणि राया पार्सेकर यांनाही भाजपने जवळ केले आहे. त्यामुळे विरोधकांची रसद कमी करण्यात मुख्यमंत्री यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे विरोधकांची रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com