Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: पणजीत विक्रमी पक्षसदस्य नोंद! 4 लाखांचे उद्दिष्ट्य; तानावडे यांनी दिली माहिती

Goa Politics: राज्यातील २७ प्रमुख कार्यकर्ते महाराष्ट्रातील निवडणुकीत सक्रिय असल्याने त्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम सदस्य नोंदणीवर झाला आहे. पणजीत विक्रमी १४ हजार पक्षसदस्य नोंदल्याचे तानावडे यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

BJP Membership Drive

पणजी: भाजपने राज्यात सुरू केलेल्या सदस्य नोंदणीला सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत राज्यात ३ लाख ३२ हजार सदस्य नोंदणी झाली असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ४ लाख सदस्य करण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे. त्याशिवाय १ हजार ९०० सक्रिय सदस्य नोंदणी झाली असून, पणजीत विक्रमी १४ हजार सदस्य नोंद झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

तानावडे यांनी सांगितले की, वाळपई सर्वात जास्त, तर पेडणेत सर्वात कमी सदस्य नोंदले गेले आहेत. १५ नोव्हेंबर पर्यंत ४ लाख सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे.

वाळपई आणि पर्ये दोन्ही मतदारसंघ सदस्य नोंदणीत आघाडीवर असून, उत्तर गोव्यात साळगाव, कुंभारजुवे, कळंगुट, म्हापसा, थिवी, कळंगुट आणि शिवोलीत कमी सदस्य नोंदणी झाली आहे. त्याशिवाय दक्षिण गोव्यात वेळ्ळी, कुडचडे, नावेली या मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी झाल्याचे आढळले आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रमुख २७ कार्यकर्ते महाराष्ट्रात सक्रिय

राज्यातील २७ प्रमुख कार्यकर्ते महाराष्ट्रातील निवडणुकीत सक्रिय असल्याने त्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम सदस्य नोंदणीवर झाला आहे. पणजीत विक्रमी १४ हजार पक्षसदस्य नोंदल्याचे तानावडे यांनी सांगितले.काँग्रेस तिकीटावर निवडून भाजपात आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात नोंदणी कमी झाल्याचे दिसत असल्याने तेथे सदस्य वृद्धीसाठी भाजप काय उपाय करणार, ते पहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT