CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa BJP : काँग्रेस आमदारांच्या बंडानंतर भाजपाकडून कार्यकर्त्यांची मनधरणी

शिवोली, साळगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP : काँग्रेसच्या आठ आमदारांचा गट हा नुकताच भाजपात विलीन झाला असून त्यामुळे भाजपाचे माजी लोकप्रतिनिधी तसेच जुने कार्यकर्ते हे बरेच दुखावले गेले आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी म्हापशातील उत्तर गोवा भाजपा जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्री तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी शिवोली व साळगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, राजकीय घडामोडीविषयी साळगाव व शिवोलीमधील जुन्या कार्यकर्त्यांना माहिती देण्यासाठीच ही बैठक बोलावली होती. त्यांना सर्व कल्पना दिली असून, सर्व कार्यकर्ते एकसंध आहेत. त्यांना कुठलीही हरकत नसून, ते पक्षाचे काम यापुढे करत राहणार आहेत.

या बैठकीला भाजपात आलेले नवीन आमदार नव्हते, असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री म्हणाले, आता जुन्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर, सर्व नवीन आमदार व जुन्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक बोलवणार आहोत. अशा राजकीय घडामोडीनंतर, कार्यकर्ता हा लहानशी नाराजी व्यक्त करतोच, ते साहजिकच आहे. मात्र, सर्वजण यापुढेही पक्षासाठी एकत्रित काम करणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या या आठ आमदारांच्या भरण्यामुळे भाजपाच्या मतदानाची टक्केवारी वाढणार का? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, आगामी लोकसभेत उत्तर व दक्षिण गोव्यात भाजपाचे उमेदवार जिंकतील. दोन्ही ठिकाणी मागच्या पेक्षा जास्त मताधिक्क्य व टक्केवारीने भाजपाचा झेंडा फत्ते होणार असा दावा त्यांनी केला.

बैठकीनंतर माजी आमदार दयानंद मांद्रेकर म्हणाले, विद्यमान राजकीय घडामोडी आमच्यासाठी नवीन नाही. 2017 मध्येही असा प्रकार झाला होता. एवढे होऊन तो नेता 10 हजार मतांवरुन फक्त 402 मतांवर येऊन पोहचला. त्यामुळे या इतिहासाची पुनरावृत्ती येणाऱ्या काळात पाहायला मिळू शकते,.

राजकीय घडामोडीमुळे आपल्या मनात नाराजी नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता असून, यापुढे सुद्धा भाजपासाठी सर्वांसोबत एकत्रितपणे काम करत राहू आणि आगामी लोकसभा निवडणूकीत नवीन आलेल्यांसोबत काम करून पक्षाला विजयी करणार, जयेश साळगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amboli Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'! धोकादायक वळणावर ब्रेक निकामी, टेम्पो कोसळला 100 फूट खोल दरीत; चालक बचावला

Ramesh Tawadkar: 'दिलेल्या खात्‍यांमध्‍ये दम नाही', मंत्री तवडकर उद्विग्‍न; दर्शवली राजीनामा देण्‍याची तयारी

Rashi Bhavishya 15 September 2025: आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा तणावाचा, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश; प्रवासातून लाभ

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

SCROLL FOR NEXT