C. T .Ravi Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसने गोमंतकीयांची माफी मागावी: सी. टी. रवी

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यातील खाण व्यवसाय काँग्रेसच्या काळात बंद झाला. त्यावेळी राज्यात दिगंबर कामत यांचे तर देशात मनमोहन सिंग यांचे सरकार होते. खाण व्यवसाय बंद होण्यास कारणीभूत असल्याचे कबूल करून काँग्रेसने गोमंतकीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा भाजपचे प्रभारी सी. टी. रवी यांनी केले.

येथील निवडणूक कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, खोटे बोल; पण रेटून बोल, ही काँग्रेसची परंपरा आहे. गेल्या साठ वर्षांत त्यांना जमले नाही ते भाजपने केवळ दहा वर्षांत करून दाखवले. भाजप जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. त्याचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर मांडले आहे. केलेल्या विकासकामांचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर आणणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष आहे.

तुमची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पक्षाने डॉ. प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर राज्याची जबाबदारी टाकली. डॉ. सावंत यांनी अल्पावधीत अतिशय चांगले काम केले. महामारीच्या कठीण परिस्थितीतही त्यांनी कार्यकुशलता दाखवली. ही निवडणूक आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत. स्वाभाविकपणे आगामी काळात राज्याचे नेतृत्व तेच करतील.

केंद्र असो व राज्य सरकारच्या सर्व सामाजिक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य डॉ. सावंत यांच्या सरकारने केले आहे. यामुळे जनता आम्हाला प्रचंड मतांनी निवडून देईल, अशी खात्री रवी यांनी व्यक्त केली.

...तर विरोधकांनी डोळे तपासावेत

‘आप’ आणि तृणमूल हे दोन्ही पक्ष भाजप द्वेष्टे आहेत. लोकांना आमिषे दाखवून न झेपणारी आश्वासने देत सुटले आहेत. विरोधकांनी विकास उघड्या डोळ्यांनी पाहावा, मगच बोलावे. तिसरा मांडवी पूल, झुआरी पूल, सरकारी इस्पितळांत अत्याधुनिक सोयीसुविधा, गोवा-मुंबई महामार्ग रुंदीकरण, आयआयटी हब, मोपा विमानतळ, किनारपट्टीवरील स्वच्छतागृहे अशी कैक कामे आम्ही केली. तरीही विरोधकांना ती दिसत नसतील त्यांनी डोळे तपासून घ्यावेत, असा टोला रवी यांनी हाणला.

राहुल गांधींची अभ्यासाविना टीका

रवी म्हणाले, राहुल गांधींना कोणत्याही विषयाचा अभ्यास नसतो. म्हणूनच ते भाजपवर टीका करण्यात धन्यता मानतात. राज्यातील खाण व्यवसाय त्यांच्याच काळात बंद पडला, हे ते सोयीस्करपणे विसरले आहेत. राज्यातील कोळसा हबविषयी राहुल यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना रवी म्हणाले, आम्हालाही पर्यावरणाची जाण आहे. गेल्या दहा वर्षांत देशात आणि राज्यात आम्ही पर्यावरपूरक उद्योग उभारण्यास प्राधान्य दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT