Goa Assembly Elections: Sanjay Raut in Goa Dainik Gomantak
गोवा

भाजप कोणत्याही परिस्थितीत गोव्यात सत्तेत येत नाही, लिहून घ्या : राऊत

Sanjay Raut in Goa: गोव्यातील पत्रकार परिषदेत भाजपवर टीकास्त्र

दैनिक गोमन्तक

Goa Assembly Elections: गोव्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यामुळे आता सर्वच पक्षांतर्फे जय्यत तयारी आपल्याला दिसत आहे. नॅशनल तसेच गोव्यातील स्थानिक पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. रोज पक्षांच्या पत्रकार परिषद होत आहेत. जनतेला नेत्यांतर्फे आवाहन करण्यात येत आहे. पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गोवा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमार्फत जनतेशी संवाद साधला आहे.

दरम्यान त्यांनी गोव्यातील शिवसेनेची (Shivsena) पहिली उमेदवार यादी जाहीर केली. ते म्हणाले, 'आम्ही ठरवलंय की गोव्यातील प्रत्येक मतदारसंघातून शिवसेना गांभीर्याने निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते प्रचारासाठी येतील, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे स्वत: प्रचाराला येणार आहेत. सध्या गोव्यात अत्यंत विचित्र पद्धतीचे राजकारण सुरू आहे. वापरा आणि फेकून द्या, गरज सरो , वैद्य मरो अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि याचा फटका जे बाहेर गेलेत त्यानाही बसणार आहे, आणि भाजपलाही बसणार आहे. या निवडणुकीत भाजप (BJP) कोणत्याही परिस्थितीत निवडून येत नाही, ही तुम्ही लिहून घ्या.', असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

दरम्यान भाजपच्या आधीपासून शिवसेना पक्ष आहे, मग शिवसेनेला गोव्यात यश का मिळत नाही असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, 'भाजपा तरी आधी कुठे यश मिळाले होते? ते आता सत्तेवर आहेत म्हणून. त्याप्रमाणेच आम्हालाही आधी महाराष्ट्रात अपयश पत्करावे लागले होते, पण आम्ही सत्तेवर आलोच. आता यंदा गोव्यातही हे चित्र वेगळे असणार आहे. ही निवडणूक (Goa Elections 2022) आमच्यासाठी ऐतिहासिक आहे.

'गोव्यात भाजपविरोधी विखुरलेले पक्ष हीच भाजपची सध्या ताकद आहे. पण भाजपने जास्त भ्रमात राहू नये. कधी चित्र बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे नक्कीच शिवसेनेला या निवडणुकीत विजय मिळणार आहे आणि भाजपचा पराभव होणार आहे.' असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT