Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: भाजपला कॉंग्रेसची भीती वाटते! राहुल गांधींवर गुन्हा दाखल केल्यामुळे अमित पाटकरांची टीका

'भारत जोडो न्याय यात्रे'च्या दहाव्या दिवशी काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत असताना आसाम पोलिसांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Kavya Powar

Goa Congress Slams Bjp Government: 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या दहाव्या दिवशी काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत असताना आसाम पोलिसांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला. यावरून गोवा कॉंग्रेसने निषेध व्यक्त केला आहे.

भाजपचा निषेध...

घडलेल्या प्रकारावरून कॉंग्रेसने पणजीत आंदोलन करत भाजपवर टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्ला झाल्याचा आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने काल मंगळवारी भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पुतळ्याचे दहन केले.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लोस अल्वारेस फरेरा, उपाध्यक्ष एम.के. शेख, मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, गोव्याचे एआयसीसी अल्पसंख्याक प्रभारी तरन्नुम खान उपस्थित होते.

भाजपला कॉंग्रेसची भीती वाटते...

मणिपूरमधून सुरू झालेल्या यात्रेला राहुल गांधींना मिळत असलेल्या पाठिंब्याची भाजपला भीती वाटत असे म्हणत अमित पाटकरांनी भाजपवर निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, भाजप आमचे नेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने ते देशातील सामान्य जनतेच्या समस्या मांडत आहेत. आसाममध्ये भाजपने भारत जोडो न्याय यात्रेवर केलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.

याबाबत आमदार कार्लोस फरेरा म्हणाले की, राहुल गांधी लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र भाजप त्यांच्या यात्रेत अडथळा आणत आहे. त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणे हे त्याचाच एक भाग आहे. कारण काँग्रेस अधिक मजबूत होईल अशी भीती भाजपला वाटत आहे. आसामचे मुख्यमंत्री हुकूमशाही शासन चालवत आहेत, जे सामान्य जनता अजिबात खपवून घेणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT