BJP's victory in Priyol again due to Govind Gawde| Govind Gawde News | Goa election result 2022 news updates Dainik Gomantak
गोवा

अखेर गोविंद गावडे यांच्यामुळे प्रियोळात पुन्हा कमळ फुलले !

गोविंदप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी

दैनिक गोमन्तक

खांडोळा: प्रियोळ मतदारसंघात कोण विजयी होणार? याची चर्चा गेला महिनाभर खूपच रंगली आणि अकेर गोविंद गावडे यांना जनतेने साथ दिली. अटीतटीच्या सामन्यात ते विजयी झाले. त्यामुळे त्यांची प्रचंड मोठी मिरवणूक काढण्यात आली. फर्मागुढी श्री गणेश मंदिर, श्री महालसा मंदिर, माशेलात श्री देवकीकृष्ण मंदिरात दर्शन घेतला. यावेळी गोविंदप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Goa election result 2022 news updates)

प्रियोळ मतदारसंघात परिवर्तनाची लाट आल्याचे चित्र होते, परंतु गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचे पारडे जड झाले. त्यांना पाठिंबा वाढला. संदीप निगळये यांनी भाजपमध्‍ये बंड करूनही ते अपेक्षित पल्ला गाठता आला नाही.

शिवाय 2017 साली पराभूत झालेले मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना पुन्‍हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. अवघ्या मतांनी पराभव पत्करावा लागला असताल तरी त्यांनी गोविंद गावडे यांना त्‍यांनी ‍चांगली टक्कर दिली. प्रियोळात यापूर्वीचा इतिहासात प्रत्येकाने दोन वेळा आमदारकी फटकावली आहे. डॉ. काशिनाथ जल्मी, ॲड. विलास सतरकर, दीपक ढवळीकर दोन वेळा विजयी झाले. त्यानंतर गोविंद गावडेही दोन वेळा विजयी झाले. दीपक ढवळीकरांचा या मतदारसंघात दोन वेळा पराभव झाला. त्यांनी चार वेळा निवडणूक लढवली.

विधानसभेत 19 नवे चेहरे

मतदारांनी नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याने संकल्प आमोणकर (मुरगाव), एल्टन डिकॉस्टा (केपे), डॉ. चंद्रकांत शेट्ये (डिचोली), प्रवीण आर्लेकर (पेडणे), रूडॉल्फ फर्नांडिस (सांताक्रुझ), कार्लोस परेरा (हळदोणे), व्हेन्सी विएगस ( बाणावली), आंतोनीयो वाझ ( कुठ्ठाळी), राजेश फळदेसाई (कुंभारजुवे), युरी आलेमाव (कुंकळ्ळी), डिलायला लोबो (शिवोली), प्रेमेंद्र शेट (मये), केदार नाईक (साळगाव), जीत आरोलकर (मांद्रे), उल्हास तुयेकर (नावेली), दिव्या राणे (पर्ये), विरेश बोरकर (सांत आंद्रे), दाजी साळकर ( वास्को), क्रूझ सिल्वा (वेळ्ळी). 19 चेहरे नव्या विधानसभेत निवडून आल्याने ही आकडेवारी सुमारे 50 टक्के आहे.

पराभूत आमदार

दयानंद सोपटे (मांद्रे), बाबू आजगावकर (पेडणे), राजेश पाटणेकर (डिचोली), विनोद पालेयकर (शिवोली), जयेश साळगावकर (साळगाव), ग्लेन टिकलो (हळदोणा), टोनी फर्नांडिस (सांताक्रुझ), फ्रान्सिस सिल्वेरा (सांत आंद्रे), प्रवीण झांट्ये (मये), मिलिंद नाईक (मुरगाव), कार्लोस आल्मेदा (वास्को), एलिना साल्ढाणा (कुठ्ठाळी), बाबाशान डिसा (नुवे), चर्चिल आलेमाव (बाणावली), क्लाफासिओ डायस (कुंकळ्ळी), फिलिप नेरी रॉड्रिग्ज (वेळ्ळी), बाबू कवळेकर (केपे), दीपक पाऊसकर (सावर्डे), प्रसाद गावकर (सांगे), इजिदोर फर्नांडिस ( काणकोण) हे विद्यमान २० आमदार पराभूत झाले तर पांडुरंग मडकईकर आणि प्रतापसिंह राणे यांनी निवडणूक लढवली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT